गणेश मापारी / खामगावपिण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासले असता जिल्ह्यातील २0४ गावांमधील पाणी नमुने दूषित (पिण्यास अयोग्य) आढळले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये त्वरित स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाकडून देण्यात आले आहेत. पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूमध्ये आरोग्य विभागाकडून पिण्याच्या पाण्याची तपासणी केली जाते. उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होत असल्याने विहिरींमधील गाळातील पाणी पिण्यासाठी वापरल्या जाते, तसेच हातपंपाद्वारे दूषित पाण्याचा उपसा होतो, त्यामुळे आरोग्य विभागाकडून उन्हाळ्याच्या दिवसात पिण्याच्या पाण्याची तपासणी केल्या जाते. पाणी नमुने तपासल्यानंतर ग्रामपंचायतींना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात येतात. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतींना हिरवे, पिवळे व लाल अशा तीन पद्धतीचे कार्डही पाण्याच्या वापराबाबत दिल्या जातात. दरम्यान, पावसाळ्यात नदी-नाल्यांमध्ये तसेच विहिरींमध्ये गढूळ पाणी राहते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसातही दूषित पाण्याचा पुरवठा बहुतांश गावांमध्ये होतो. बुलडाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ६९४ गावांमधील पाणी नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी २0४ गावांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, संबंधित ग्रामपंचायतींना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक गावातील जलसुरक्षकांना आता पाण्याच्या स्वच्छतेबाबत काळजी घ्यावी लागणार आहे.
२00 गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा !
By admin | Updated: July 27, 2016 00:12 IST