शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांचा वीज पुरवठा होणार खंडित!

By admin | Updated: May 25, 2017 00:53 IST

बुलडाणा : महावितरणच्या परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे थकबाकी प्रलंबित असल्यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महावितरणच्या परिमंडळातील घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे थकबाकी प्रलंबित असल्यामुळे या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.घरगुती, औद्योगिक व वाणिज्यिक या वर्गवारीतील ग्राहकांकडे बुलडाणा मंडळामध्ये असलेल्या पंधरा उपविभागामध्ये एकूण २ लाख ८ हजार २१९ ग्राहकांकडे २३ कोटी ५१ लाख ३५ हजार रुपये इतकी थकबाकी प्रलंबित आहे. यामध्ये बुलडाणा उपविभागात १६ हजार ८९४ ग्राहकांकडे १ कोटी ६९ लाख ७४ हजार, चिखली उपविभागात २१ हजार ७८४ ग्राहकांकडे २ कोटी १७ लाख ८२ हजार, देऊळगाव राजा उपविभागात १२ हजार १६३ ग्राहकांकडे २ कोटी ७ लाख ८६ हजार, धाड उपविभागात ९ हजार ९७ ग्राहकांकडे ७३ लाख ५२ हजार, सिंदखेड राजा उपविभागात १२ हजार ८७० ग्राहकांकडे १ कोटी ४५ लाख २३ हजार, खामगाव शहर उपविभागात ११ हजार ३७ ग्राहकांकडे १ कोटी ७९ लाख ६५ हजार, खामगाव ग्रामीण उपविभागात १६ हजार ३०६ ग्राहकांकडे १ कोटी ४७ लाख ६७ हजार, लोणार उपविभागात १० हजार ८१४ ग्राहकांकडे १ कोटी ५९ लाख ५४ हजार, मेहकर उपविभागात १९ हजार ६०८ ग्राहकांकडे २ कोटी ९५ लाख २९ हजार, संग्रामपूर उपविभागात ११ हजार २३० ग्राहकांकडे ८८ लाख ४७ हजार, शेगाव उपविभागात १० हजार ८८५ ग्राहकांकडे १ कोटी ३१ लाख ८ हजार, जळगाव जामोद १५ हजार ६१७ ग्राहकांकडे १ कोटी ७७ लाख ३९ हजार, मलकापूर उपविभागात १२ हजार २१३ ग्राहकांकडे १ कोटी ३५ लाख ७ हजार, मोताळा उपविभागात १३ हजार ७४८ ग्राहकांकडे १ कोटी २१ लाख ८२ हजार आणि नांदुरा उपविभागात १३ हजार ९५३ ग्राहकांकडे १ कोटी १ लाख १३ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित आहे. महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असून, नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते. थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.