शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे अपघातातील युवकाच्या प्रेताची अवहेलना, नातेवाईकांचा आक्रोश

By admin | Updated: February 8, 2017 13:32 IST

मालगाडीची धडक लागून मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाच्या प्रेताची अवहेलना झाल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सकाळी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उघडकीस आला.

रेल्वे पोलिसांच्या संवेदनशीलेवर प्रश्नचिन्ह
फहीम देशमुख, ऑनलाइन लोकमत
शेगाव, (जि. बुलडाणा), दि. ८ -  मालगाडीची धडक लागून मृत्यूमुखी पडलेल्या एका युवकाच्या प्रेताची अवहेलना झाल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी सकाळी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात उघडकीस आला. या प्रकारामुळे रेल्वे पोलिसांच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मृतकाच्या नातेवाईकांनी आक्रोश करीत, संबधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील गंगाप्रसाद विश्वनाथ क्षीरसागर(२५) या युवकाला मंगळवारी रात्री ८.३० वाजता डाऊन ट्रॅकवर मालगाडीची धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती नागझरी येथील रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर योगेश लोणकर यांना मिळताच, त्यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळ गाठले. रेल्वे प्रशासनाची विशेष परवानगी घेवून रात्री ८.३० वाजता मुंबई- हावडा मेल थांबविण्यात आली. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या गंगाप्रसाद क्षीरसागर याला शेगाव रेल्वे स्थानकावर आणण्यात आले. त्याचवेळी शेगाव स्थानकावर रुग्णवाहिका उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  मात्र रेल्वे डॉक्टरांनी त्या युवकाला मृत घोषित केले.  ब-याच प्रतीक्षेनंतरही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने, अखेरीस रेल्वे पोलिसांनी सदर युवकाच्या मृतदेहास एका आॅटोद्वारे शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाºयांचा कोणताही सल्ला न घेता, रेल्वे पोलिसांनी सदर युवकाचे प्रेत थेट शवागारात नेले. शवागारात प्रेत व्यवस्थित ठेवण्यात न आल्याने, प्रेताची अवहेलना झाली. मुंग्या लागल्याने मृतदेहाचे दोन्ही डोळे मुंग्यांनी खाल्ल्याचे नातेवाईकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रोश संताप व्यक्त केला. याप्रकरणी रेल्वे पोलिस स्टेशनचे ठाणेदार एम.डी.परदेशी यांना घेराव घालत, प्रेताची अवहेलना करणा-या संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली.