संदीप श्रीराम जेऊघाले (वय ३९) यांची वरवंड शिवारात गट क्र.१५२ मध्ये चार एकर शेती आहे. शेजारीच रूस्तुम जेऊघाले यांचे शेत आहे. या दोन्ही कुटुंबात शेतीच्या बांधावरून वाद आहे. मंगळवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास संदीप जेऊघाले आपल्या शेतात स्पींक्लरचा सेट बदलण्यासाठी गेले असता त्यांना श्रीकृष्ण रूस्तुम जेऊघाले, रूस्तुम सदाशिव जेऊघाले, प्रमिला रूस्तुम जेऊघाले हे संदीप जेऊघाले यांच्या शेतातील बांधावर दगड व माती टाकत असल्याचे दिसून आले. दरम्यान, संदीप जेऊघाले याला श्रीकृष्ण जेऊघाले आणि रूस्तुम जेऊघाले यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण जेऊघाले, रूस्तुम जेऊघाले, प्रमिला रूस्तुम जेऊघाले यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
शेतीच्या बांधावरून वाद, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST