शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:23 IST

बुलडाणा : जिल्हा परिषद शाळेत समान रिक्त जागा ठेवण्याच्या  धोरणानुसार विशेष श्रेणी भाग एक व दोनच्या शिक्षकांची बदली  प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३0 सप्टेंबरची मुदत देण्यात आली हो ती. मात्र या मुदतीपर्यंत जिल्ह्यात केवळ विस्थापीत शिक्षकांची  यादीच समोर आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे ४१२  शिक्षक विस्थापीत झाले असून त्यामध्ये मराठी माध्यमाचे ३९२  व उर्दू माध्यमाच्या २0 शिक्षकांचा समावेश आहे. मुदतीनंतरही  बदलीप्रक्रिया सुरूच असल्याने बदलीपात्र शिक्षकही गोंधळून  गेले आहेत. 

ठळक मुद्देमराठी माध्यमाचे ३९२ तर उर्दूचे २0 मुदतीनंतरही बदली प्रक्रिया सुरूच 

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्हा परिषद शाळेत समान रिक्त जागा ठेवण्याच्या  धोरणानुसार विशेष श्रेणी भाग एक व दोनच्या शिक्षकांची बदली  प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३0 सप्टेंबरची मुदत देण्यात आली हो ती. मात्र या मुदतीपर्यंत जिल्ह्यात केवळ विस्थापीत शिक्षकांची  यादीच समोर आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे ४१२  शिक्षक विस्थापीत झाले असून त्यामध्ये मराठी माध्यमाचे ३९२  व उर्दू माध्यमाच्या २0 शिक्षकांचा समावेश आहे. मुदतीनंतरही  बदलीप्रक्रिया सुरूच असल्याने बदलीपात्र शिक्षकही गोंधळून  गेले आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांबाबतचे नविन  धोरण फेब्रुवारी २0१७ मध्ये जाहीर झाल्यापासून बदली प्रक्रिया  सुरू झाली होती. यामध्ये येणारे विविध अडथळे दूर झाल्यानंतर  राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्ह्यांतर्गत बदल्यांमधील  पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. अर्धे   शैक्षणिक वर्ष उलटत असतांनाही शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न  अद्यापही ऑनलाइन प्रणालीतच अडकलेला आहे. संवर्ग एक,  संवर्ग दोन, संवर्ग तीन आणि संवर्ग चार अशा गटांमध्ये जिल्हा  परिषद शिक्षकांच्या बदल्या होत असून जिल्ह्यातील हजारो  शिक्षक बदली प्रक्रियेमुळे गोंधळात आहेत. ग्रामविकास  विभागाने या बदली प्रक्रियेचे नवीन परिपत्रक काढून चालू  शैक्षणिक वर्षात विलंब झाल्याने कमीत कमी बदल्या करण्याचा  निर्णय घेतला त्यासाठी ३0 सप्टेंबरपर्यंत मुदतही वाढ देण्यात  आली होती. परंतू या मुदतीपर्यंत केवळ जिल्ह्यातील विस्थापीत  शिक्षकांच्या याद्याच समोर आल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात ४१२ शिक्षक विस्थापीत असून मराठी  माध्यमाचे ३९२ व उर्दू माध्यमाचे २0 शिक्षकांचा समावेश आहे.  मराठी माध्यमाच्या शिक्षकांमध्ये विशेष श्रेणी एक मध्ये २६१ व  विशेष श्रेणी दोनमध्ये १३१ शिक्षकांचा समावेश आहे. मराठी  माध्यमामध्ये बुलडाणा तालुक्यात विशेष श्रेणी एक मध्ये ५९ व  श्रेणी दोनमध्ये ३६, चिखली तालुक्यात श्रेणी एकमध्ये ७0 व  श्रेणी दोनमध्ये २0, खामगाव श्रेणी एकमध्ये १२ व श्रेणी  दोनमध्ये २१, देऊळगाव राजा श्रेणी एकमध्ये २९ व श्रेणी  दोनमध्ये ७, मोताळा श्रेणी एकमध्ये ७ व श्रेणी दोनमध्ये १७,  लोणार श्रेणी एकमध्ये १४ व श्रेणी दोनमध्ये एक, मलकापूर श्रेणी  एकमध्ये ३ व श्रेणी दोनमध्ये ७, मेहकर श्रेणी एकमध्ये ३0 व  श्रेणी दोनमध्ये ७, जळगाव जा. श्रेणी एकमध्ये ६ व श्रेणी  दोनमध्ये २, नांदुरा श्रेणी एकमध्ये ३ व श्रेणी दोनमध्ये १, संग्राम पूर  श्रेणी एकमध्ये ३, शेगाव श्रेणी एकमध्ये ११ व श्रेणी दोनमध्ये  १0, सिंदखेड राजा तालुक्यात श्रेणी एकमध्ये १४ व श्रेणी  दोनमध्ये २ शिक्षक विस्थापीत झाले आहेत. मुदतीनंतरही बदली  प्रक्रिया पूर्ण न झाल्याने बदलीपात्र शिक्षक गोंधळले आहेत.  लांबत असलेल्या या  शिक्षकांच्या बदली प्रक्रियेमुळे विद्या र्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. 

आज दुपारपर्यंंत भरावे लागणार आवेदनपत्र संवर्ग एक व संवर्ग दोनमुळे जे ४१२ शिक्षक विस्थापीत झाले  त्यांना पुढील प्रक्रियेसाठी २ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत  आवेदनपत्र भरावे लागणार आहे. त्यामुळे मुदत संपल्यानंतरही  शिक्षक बदलीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता आवेदनपत्र  भरल्यानंतर पुन्हा किती दिवस प्रक्रिया लांबणार, असा प्रश्न  शिक्षकांना पडत आहे. या लांबणार्‍या प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांंकडे  शिक्षकांचे दुर्लक्ष होत आहे.

असे आहेत उर्दू माध्यमाची विस्थापित पदेजिल्हा परिषद अंतर्गत उर्दू माध्यमाचे संवर्ग एक व संवर्ग  दोनमधून २0 शिक्षक विस्थापीत झाले आहेत. त्यामध्ये संवर्ग  एकमध्ये  १७ व संवर्ग दोनमध्ये केवळ तीन शिक्षकांचा समावेश  आहे. बुलडाणा तालुक्यात सात, चिखली दोन, खामगाव सहा,    देऊळगाव राजा एक, मोताळा एक, मलकापूर एक, नांदुरा एक,  शेगाव एक असे पदे विस्थापीत झाले आहेत.