शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

क्षय, एक्सडीआर रुग्णसंख्येत वाढ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:17 IST

चिखली : जिल्हय़ात क्षय रोग व एक्सडीआर या क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची कबुली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.दीपक सावंत यांनी विधानसभेत आ.राहुल बोंद्रे यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

ठळक मुद्देआ. बोंद्रे यांच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांची कबुलीविधानसभेत आ.राहुल बोंद्रे यांनी उपस्थित केला तारांकीत प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : जिल्हय़ात क्षय रोग व एक्सडीआर या क्षयरोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याची कबुली आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना.दीपक सावंत यांनी विधानसभेत आ.राहुल बोंद्रे यांनी उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.बुलडाणा जिल्हय़ामध्ये शासकीय रुग्णालयातून उपलब्ध आकडेवारी पाहता क्षय रुग्णांच्या संख्येत वर्षाला सुमारे १५ टक्केची वाढ नोंदविल्या गेली आहे.  सन २0१६ मध्ये बुलडाणा जिल्हय़ात ८३८ नवीन थुंकी क्षयरुग्ण नोंदविण्यात आले व त्यांची सरासरी दरमहा ७0 एवढी आहे. या रुग्णांना शासकीय रुग्णालयातून सर्वसाधारण औषधोपचार प्रथमत: सहा ते आठ महिने देण्यात येते. काही क्षय रुग्ण संपूर्ण उपचार पूर्ण करतीलच, असे नाही; त्यामुळे अनियमित तथा अपूर्ण औषधोपचार घेतल्यास सदर रुग्णांच्या जंतुमध्ये क्षय विरोधी औषध बदल प्रतिरोध तयार होतो.  अशा रुग्णांना  ड्रग रेजिस्टंट एक्सडीआर क्षयरुग्ण असे म्हणतात. अशा क्षय रुग्णांना २४ ते २७ महिने औषधोपचार घ्यावा लागतो. या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता त्यांना सरकारतर्फे मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात येतो. असे असताना बुलडाणा जिल्हय़ामध्ये होणारी क्षय रुग्णांच्या संख्येतील वाढ गंभीर असल्याची बाब आमदार राहुल बोंद्रे यांनी सभागृहात बोलताना व्यक्त केली. त्यावर सदर क्षयरोग आणि एक्सडीआर रुग्णांसाठी शासनाने औषधोपचाराची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याचे स्पष्ट करीत, बुलडाणा जिल्हय़ामध्ये औषध सर्व शासकीय रुग्णालयात उपलब्ध असून, या रोगावर नियंत्रण मिळविण्याबाबत शासन कार्यवाही करीत आहे व रुग्णांना त्यासाठी त्रास होणार नाही, याची दक्षताही घेतली जात आहे, असे स्पष्ट करून वरील रोगावर नियंत्रण मिळविले जाईल, असा खुलासा सावंत यांनी केला आहे.