शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थेट निवडणुकीमुळे सरपंच पदासाठी चुरस वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:40 IST

सिंदखेडराजा: तालुक्यातील ८0 पैकी ३0 ग्रामपंचायतींची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रथमच थेट मतदारातून सरपंच निवडल्या जाणार असल्याने  निवडणुकीत रंगत येणार आहे.

ठळक मुद्देसिंदखेडराजा तालुक्यात ३0 ग्रामपंचायतींसाठी होणार निवडणूक

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: तालुक्यातील ८0 पैकी ३0 ग्रामपंचायतींची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, ७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. प्रथमच थेट मतदारातून सरपंच निवडल्या जाणार असल्याने  निवडणुकीत रंगत येणार आहे.या निवडणुकीतील ग्रामपंचायतींसाठीची आचारसंहिता  १ सप्टेंबर रोजी दुपारी  ४ वाजेपासून लागू करण्यात आली आहे.  निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र ऑनलाइन दाखल करावे लागणार आहे. तर सरपंच थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे. तालुक्यातील एकूण ग्रामपंचायतींची संख्या ८0 असून, त्यापैकी ३0 ग्रामपंचायतींची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यामध्ये जांभोरा, सावरगाव माळ, वर्दडी बु; अंचली, आडगावराजा, शिवणी टाका, झोटिंगा, गुंज, बाळसमुद्र, पिंपळगाव सोनारा, शिंदी, राताळी, सावखेड तेजन, सोयंदेव, धानोरा, खैरव, वाघाळा, केशवशिवणी, ताडशिवणी, चांगेफळ, रुम्हणा, जऊळका, पिंपळगाव कुडा, देवखेड, तढेगाव, साठेगाव, वाघजाई, उमरद, हिवरखेड पूर्णा व निमगाव वायाळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.या निवडणुकीसाठी अधिसूचना येत्या गुरुवारी  ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. इच्छुक उमेदवारांना आपले नामनिर्देशनपत्र ऑनलाइन दाखल करण्याची मुदत १५  ते २२ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ वाजता ते ४.३0 वाजतापर्यंत आहे. दरम्यान, यामध्ये १७ सप्टेंबर रविवार व  २१ सप्टेंबर, गुरुवारी सुटी असल्याने नामनिर्देशन दाखल करता येणार नाही. नामनिर्देशन अर्जांची छाननी २५ सप्टेंबर, सोमवारी सकाळी ११ वाजेपासून सुरू होईल. २७ सप्टेंबर, बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेता येतील व त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ७ ऑक्टोबर, शनिवारी सकाळी ७.३0 ते सायंकाळी ५.३0 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. ९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. सदर निवडणूक प्रक्रियेसाठी तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सारिका भगत, प्रशांत वाघ आदींसह प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे.