चिखली येथील मेहकर फाटा येथे जिजाऊंचा अर्धाकृती पुतळा आहे. या पुतळा परिसरात जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मोठ्या संख्येने दिवे व मेणबत्ती पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांचा लख्ख प्रकाश आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय...जय जिजाऊ जय शिवराय !’ अशा घोषणांनी जिजाऊ भक्तांनी हा परिसर दुमदुमून सोडला. शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर व त्यांच्या पत्नी वैशाली खेडेकर यांच्या पुढाकाराने हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे व वैशाली खेडेकर यांच्या हस्ते माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुणाल बोंद्रे, कपिल खेडेकर, नगरसेवक गोपाल देव्हडे, प्रा. डॉ. राजू गवई, उडाण फाउण्डेशनचे शेख इम्रान, बंटी लोखंडे, गुरु बिडवे, हजर इम्रान, रईस बागवान, मो.आरिफ, शे.सुभान आदींसह जिजाऊप्रेमींची उपस्थिती होती.
चिखली येथे दीपोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:28 IST