शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना घरबसल्या डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:36 IST

महसूल विभागाने डिजीटल स्वक्षरीचा सातबारा आॅनलाइन उपलब्ध केलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सध्या शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणी कामात व्यस्तत आहेत. परंतू पीक कर्जासह विविध कामासाठी लागणाºया सातबाराकरीता आता शेतकऱ्यांना पायपीट करण्याची गरज पडणार नाही. महसूल विभागाने डिजीटल स्वक्षरीचा सातबारा आॅनलाइन उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे शेतकºयांना घरबसल्या हा सातबारा मिळविता येणार आहे.शेतकºयांना विविध कामासाठी सातबारा आवश्यक आहे. सध्या पीक कर्ज काढण्याची गडबग आणि पेरणीची तयारीत शेतकरी आहेत. परंतू त्यासाठी सातबारा काढण्याकरीता शेतकºयांना तलाठी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. आता सातबारा मिळविण्यासाठी कुठेही जायची गरज नसून शेतकरी घरबसल्या सातबारा प्राप्त करू शकतात. सात बारा प्राप्त करण्यासाठी शासनाच्या या संकेतस्थळावर गेल्यानंतर डिजीटल स्वाक्षरीत सातबारा व मालमत्ता पत्रक या लिंकवर क्लिक करून तो मिळविता येतो.कोणत्याही खातेदाराला पहिल्यांदा गेल्यास या वर नोंदणी करावी लागते. त्यासाठी ‘न्यू युसर रजीस्ट्रेशन’ या लिंकवर क्लिक करून एकदा खाते उघडावे लागते. हे करताना आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ई मेल आयडी, जन्मतारिख आदी माहिती देवून नाव नोंदणी करता येते. यावेळी दिलेले युजरनेम व पासवर्ड जपून लहून ठेवणे आश्यक आहे. खाते तयार करताना पासवर्ड स्ट्राँग असण्यासाठी त्यामध्ये आठ अंक, त्यापैकी एक कॅपीटल लेटर व एक स्पेशल कॅरॅक्टर असावे लागते. आपल्या खात्यावर गरजेप्रमाणे आॅनलाइन डिजीटल पेमेंटद्वारे पैसे भरून खाते रिचार्जही करता येते.

आॅनलाइन शुल्कशेतकºयांना डिजीटल स्वाक्षरीचा सातबारा घेतल्यानंतर त्यासाठी त्यांना आॅनलाइन शुल्क भरण्याची व्यवस्था आहे. यासाठी स्टेट बँकेचे पेमेंट गेटवे मधून नेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड वापरून पैसे भरता येतात. खात्यावरून जेवढे डिजीटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड केले जातील त्याचे प्रती प्रत १५ रूपये प्रमाणे पैसे खात्यावरून कमी होतात.

९७.५ टक्के सातबारा डिजीटलशासनाच्या संकेतस्थळावरून जिल्हा, तालुका व गाव निवडून तसेच सर्व्हे नंबर निवडून कोणताही सातबारा काढता येऊ शकतो. आपले हे खाते वापरून आपल्याला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही तालुक्यातील कोणत्याही गावातील कोणत्याही खातेदाराचा कोणताही डिजीटल स्वाक्षरीत सातबारा डाऊनलोड करता येतो. राज्यातील ९७.५ टक्के सातबारा डिजीटल स्वाक्षरीत झाले असून शेतकºयांना घरी बसून आपले मोबाईलवर अथवा संगणकावर हा सातबारा प्राप्त करून घेता येणे सोईचे झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा