शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थांच्या ३१ नमुन्यांमध्ये भेसळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2016 02:38 IST

बुलडाणा जिल्हा अन्न व औषध विभागाची तपासणीत मिठाई, दूध व तेलाच्या नमुन्यात आढळली भेसळ.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २१- दररोज लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले असून, यामुळे दररोजच्या अन्नाबरोबर अक्षरश: विष घातल्या जात आहे. जिल्हा अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्य वस्तूच्या दुकानांमध्ये महिनाभरात केलेल्या तपासणीत ही बाब उघड झाली आहे. यात खाद्यपदार्थांंंच्या ३१ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली आहे. नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे तसेच स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत, सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाकडून तब्बल २८0 खाद्य व किरणामाल विक्री प्रतिष्ठानांमधील खाद्य वस्तूंचे नमुने घेत, त्यांची तपासणी करण्यात आली. यात ३१ वस्तूंच्या नमुन्यामध्ये भेसळ होत असल्याची बाब उघडकीस आली. हे सर्व नमुने अप्रमाणित घोषित करण्यात आले. मिठाईत सर्वाधिक भेसळसणासुदीच्या काळात मोठय़ा प्रमाणात मिठाई तयार करण्यात येते. मिठाई, दूध व किराणाचे २८0 दुकानांमधील २३८ खाद्य पदार्थांंंचे नमुने अन्न व औषध विभागाने तपासले असून, यामध्ये खाद्यतेलाचे पाच, दुधाचे सहा, तसेच सर्वाधिक मिठाईचे २0 नमुने, असे ३१ नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आली. सर्व प्रकरण न्यायालयीन निर्णयासाठी दाखल आहे.खाद्यपदार्थ तपासणी प्रयोगशाळा नाही!तपासणीदरम्यान एखाद्या खाद्यपदार्थात भेसळ आढळून आली, तर त्याची तपासणी करण्यासाठी बुलडाणा अन्न प्रशासनाकडे स्वत:ची प्रयोगशाळा नाही. बर्‍यावेळा नमुने अमरावती व अकोला प्रयोगशाळेत पाठविले जातात. शिवाय विभागात मनुष्यबळ कमी असल्यामुळे कारवाई करताना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागते.हॉटेल, रेस्टॉरंट, स्विट मार्ट, किराणा दुकान व इतर अन्न पदार्थ विक्री करणार्‍या प्रतिष्ठानांवर आमच्या नियमित आकस्मिक भेटी असतात. त्यातून आम्ही पदार्थ व साहित्याचे नमुने घेऊन ते परीक्षणासाठी पाठवितो. दिवाळीनिमित्त अन्न प्रशासनाचे बाजारपेठेवर विशेष लक्ष आहे. शिवाय मिठाई खरेदी करताना नागरिकांनी जागृत रहावे.- गोंविद माहोरे अन्न अधिकारी अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा