डोमरूळ : बुलडाणा तालुक्यातील धाड पाठोपाठ आता सातगाव म्ह. येथे डायरियाची लागण झाली आहे. आतापर्यंत १0६ रूग्णांचे निदान झाले असून, सध्या २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाकींना उपचारानंतर सुटी देण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील सातगाव म्हसला गावातील वार्ड नं.२ व ३ मधील नागरिकांना ७ जुलै रोजी डायरिया रोगाची लागण झाली होती. स्थानिक आरोग्य उपकेंद्रात रूग्णांना उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तर काहींना धाड येथील ग्रामीण रूग्णालयात तथा खासगी दवाखान्यामध्ये पाठविण्यात आले. सदर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अफसर सय्यद, डॉ.प्रशांत इंगळे, आरोग्य सेविका पहुरकर मॅडम लक्ष ठेवून आहेत. तसेच बुलडाणा येथील डॉ.पंकज शर्मा यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दूषित पाण्यामुळे डायरिया साथरोगाची लागण झाली असावी, असा अंदाज वैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे.
सातगाव येथे डायरियाची साथ
By admin | Updated: July 8, 2014 23:23 IST