शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: August 4, 2014 00:01 IST

धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीच्यावतीने धनगर समाजाचा भव्य मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर

मलकापूर : धनगर समाजाच्यावतीने घटनेत दिलेल्या अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची त्वरीत अंमलबजावणी करण्याच्या मागणीकरीता मलकापूर तालुक्यातील धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीच्यावतीने धनगर समाजाचा भव्य मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर नेण्यात येवून उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना स्वाक्षर्‍यांचे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. केंद्राच्या महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रामध्ये धनगर ही जमात अनुसुची क्र.३६ वर असताना सुध्दा महाराष्ट्र सरकारने गेल्या ६५ वर्षापासून या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या नाहीत. त्यामुळे दर्‍याखोर्‍यांमध्ये राहणारा व महाराष्ट्रभर विखुरलेला धनगर समाज हा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व इतर हक्कांपासून वंचीत राहत आहे. त्यामुळे धनगर समाजाला देण्यात आलेल्या घटनेतील एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मधुकर फासे, विनय काळे, चंद्रकांत कवळे, अनिल पाचपोळ, शिवदास सुरळकर, गजानन बोरसे, श्रीराम पुंडे, राजु बोरसे, ओंकार पाचपोळ, गोविंदा बोरसे, सौ.विद्या फासे, सौ.रंजना बोरसे, अमोल पाचपोळ यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. गोविंद विष्णु महाजन विद्यालयाजवळून वाजत गाजत भंडारा उधळत डोक्यात टोपी, रूमाल, हातात पिवळे झेंडे, आरक्षणाची मागणी करणारे फलक, शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत या मोर्चात मोठय़ा संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर मधुकर फासे, चंद्रकांत कवळे, विनय काळे, शत्रुघ्न पाचपोळ, सौ.रंजना बोरसे, विद्या फासे यांनी मोर्चाला संबांधित केले व आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सादर केले. तसेच प्रलंबित मागण्या शासनाने मान्य न केल्यास यापुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आपल्या भाषणातून दिला. या मोर्चामध्ये नानाभाऊ बाबर, साहेबराव फासे, डॉ.बोरसे, डॉ.सपकाळ, सौ.निता सपकाळ, रामचंद्र बोरसे, अनिता सुरळकर, निना बोरसे, संगीता सरकार, वंदना वरखडे, सुनंदा पाचपोळ, आत्माराम बोरसे, सोपान घोंगे, सौ.प्राजक्ता सपकाळ, सौ.सविता कवळे यांचेसह मलकापूर तालुक्यातील धनगर समाज बांधव आपल्या पारंपारीक धनगर वेशभूषेत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार यांनी मागण्यांचे निवेदन राज्य शासनाकडे पाठवून मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन यावेळी मोर्चकर्‍यांना दिले. यावेळी अनेक धनगर समाज बांधवांची उपस्थिती होती.