धामणगाव बढे (जि. बुलडाणा): येथून लग्नाचे वर्हाड घेऊन जाणार्या मेटॅडोर व एस.टी.बसमध्ये बाळापूरजवळ झालेल्या भीषण अपघातात येथील चार युवकांचा मृत्यू झाला असून, तिघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. धामणगाव बढे येथील रहिवाशी व सध्या मुंबई, उल्हासनगर येथे वास्तव्यास असलेले हरी दगडू काटे यांच्या मुलाचा विवाह अकोला शहरातील नथ्थूजी मोरे यांच्या मुलीशी १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. या विवाहाकरिता वर्हाड अकोला जात असताना एस.टी.बस व टाटा ९0९ या आयशर गाडीमध्ये भीषण अपघात झाला. टाटा ९0९ ही गाडी धा.बढे येथील अस्लमखाँ रशिदखाँ यांची असून, स्वत: अस्लम ही गाडी चालवित होता. या अपघातामध्ये धा.बढे येथील दीपक अर्जुन लेनेकर (वय ३५), अरुण तुकाराम काटे (वय ३८), प्रभु शंकर गवळी (वय २८), रवि मोतीराम शहाने (वय २८) या युवकांचा मृत्यू झाला तर नीलेश शिवाजी दांडगे व इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. रात्री उशिरापयर्ंत मृतांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली नाही.
धामणगाव बढे गावावर शोककळा
By admin | Updated: July 13, 2016 02:13 IST