शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव परिसरात दुबार पेरणीस प्रारंभ!

By admin | Updated: July 15, 2017 00:59 IST

घाटाखालील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : घाटाखालील विविध तालुक्यात अपुरा पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घाईघाईत शेतमशागतीची कामे उरकून पावसाळा सुरू होत असल्याचे समजून पेरणी उरकून घेतली; परंतु यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या. जुलै महिन्यातही असाच प्रकार काही शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलेले आहे. घाटाखालील विविध तालुक्यातील अनेक गावांमध्ये आता पेरण्यासोबतच दुबार-तिबार पेरण्याही सुरू असल्याचे चित्र दिसून येते.बोरखेड : परिसरात गेल्या २५ दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे कोरडवाहू पेरणी उलटली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट पुन्हा शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या सुरूही केल्या आहेत.बोरखेड, पळसोडा, सोनाळा, पिंगळी, वारखेड, सगोडा आदी भागात १६ जून रोजी पावसाने हजेरी लावली. त्या आधारे जास्तीत जास्त कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर काही शेतकरी अधिक पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने त्यांची पेरणी रखडली. परिणामी, या भागात पंचवीस दिवसांपासून पाऊस न आल्यामुळे जमिनीतून अंकुरलेले पीक पाण्याअभावी जळून गेले. अखेर शेतातील पीक जिवंत ठेवण्यासाठी कुठलीही पाणी व्यवस्था नसल्याने बरेच शेतकऱ्यांनी शेतातील पीक वखरून टाकले. पुन्हा १२ जुलैच्या मध्यरात्रीपासून या भागात पावसाचे आगमन झाल्याने पेरणीसह दुबार पेरणीला वेग आला आहे; मात्र पेरणीला खूप उशीर झाल्याने शेतात कोणते पीक पेरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. खरिपाच्या पेरणीला झालेला उशीर, नैसर्गिक लहरीपणामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आल्याने आज रोजी पेरणीसाठी खत बियाण्यासाठी पैसा कोठून उपलब्ध करावा, या चिंतेत शेतकरी वर्ग दिसत आहे. नैसर्गिक कोपामुळे दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी सापडल्यामुळे मोठा आर्थिक फटका त्याला बसत आहे, तरी शासनाकडून दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत मिळण्याची मागणी कोरडवाहू शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.