शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
2
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
3
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
4
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
5
'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?
6
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!
7
Video: घरात अन् महाराष्ट्रात जिथं असाल तिथे मराठीत बोला, नाहीतर...; अजित पवारांचं आवाहन
8
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
9
८ वर्षाचं नातं क्षणातच विसरली, पत्नीनं केलेल्या कांडामुळे पती झाला शॉक; चिठ्ठी लिहिली अन्...
10
MCX वर आपटले होते, पण सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी करणार असाल तर पाहा लेटेस्ट रेट
11
Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य
12
Desi Jugaad: तरुणांची चपाती फुगवण्याची सीक्रेट ट्रिक व्हायरल; व्हिडीओ पाहून महिलांची उडेल झोप!
13
निष्काळजीपणाचा कळस! रुग्णालयात महिलेला लावलं एक्सपायर्ड ग्लुकोज, तोंडातून फेस आला अन्...
14
बिहार निवडणुकीच्या रणधुमाळीतच भाजपची मोठी कारवाई, चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; करण्यात आले गंभीर आरोप
15
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
16
“महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड, कर्जमाफी करावी; राज्य दिवाळखोरीत काढले”: हर्षवर्धन सपकाळ
17
EPF खातेधारकांना मोठी भेट! 'फ्री'मध्ये मिळतोय ₹७ लाखांपर्यंतचा जीवन विमा; कुटुंबाला मिळेल मोठा आधार
18
२० वर्षीय भारतीय तरुणीवर ब्रिटनमध्ये बलात्कार, आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद; वर्णद्वेषातून कृत्य
19
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा

प्रशासनाची दप्तरदिरंगाई; खामगावात विकासकामांना मिळेना गती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 13:46 IST

खामगाव: शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झालेली असली तरी प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र असून सत्ताधारी हतबल झालेले दिसत आहेत.

ठळक मुद्देकोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात मंजूर झालेली आहेत. पालिकेत सत्ता स्थापन होवून वर्षपूर्ती झाली तरी अद्याप कोणतेही विशेष बदल शहरवासीयांना जाणवत नाहीत.  प्रशासनाकडून कामांना गती दिली जात नसल्याने सत्ताधारी हतबल झाले आहेत. 

- अनिल गवई

खामगाव: शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर झालेली असली तरी प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईमुळे या कामांना गती मिळत नसल्याचे चित्र असून सत्ताधारी हतबल झालेले दिसत आहेत. तर विषय समितींचे सभापती बदलल्याने या कामात आणखी अडसर निर्माण झाला आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मानाचे स्थान असलेल्या खामगाव पालिकेत अनेक वर्षांनंतर भाजप(परिवर्तना)ची सत्ता स्थापन झाली. कृषिमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांचे होमटाऊन व स्वत: भाऊसाहेबच पालकमंत्री असल्याने विकासाची अभूतपूर्व संधी चालून आली.  भाऊसाहेबांनी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही वेळोवेळी देवून भरमसाठ निधी उपलब्धही करुन दिला. परिणामी कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात मंजूर झालेली आहेत. परंतु या कामांना प्रत्यक्षात सुरुवात अद्यापही झाली नाही. पालिकेत सत्ता स्थापन होवून वर्षपूर्ती झाली तरी अद्याप कोणतेही विशेष बदल शहरवासीयांना जाणवत नाहीत.  याला प्रमुख कारण म्हणजे प्रशासकीय स्तरावरील उदासिनता व असहकार्य असल्याचे सत्ताधारी नगरसेवकच बोलताना दिसून येतात. प्रशासनाकडून कामांना गती दिली जात नसल्याने सत्ताधारी हतबल झाले आहेत. 

दरम्यान, विविध समाजघटकांना तसेच सर्व समावेशक लाभ देण्यासाठी सत्तेच्या वाटाघाटीचा (विकेंद्रीकरण) ‘पांडुरंग’ फॉर्म्युलाही अस्तित्वात आला. त्यानुसार ‘टर्म’वाईज नगरसेवकांना संधी दिली जात आहे. मात्र, ही बदलाची नांदी आता पक्षश्रेष्ठींसह नवोदितांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते.  पालिकेच्या विविध विषय समितीची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडली. या निवडणुकीनंतर नवीन विषय सभापतींसमोर ‘तांत्रिक’ अडचण निर्माण झाली आहे. विषय सभापतींचा ‘नवखे’पणा मुख्य अडसर ठरत असल्याने ‘परिवर्तना’च्या विकासाची गाडी रुळावर येण्यासाठी बराच अवधी लागेल, अशी चर्चा पालिका वर्तुळात आता रंगत आहे.

 खामगाव पालिकेतील विषय समिती निवडणुकीत आरोग्य समिती सभापतीपदी  हिरालाल बोर्डे यांची तर बांधकाम समिती सभापतीपदी सौ. शोभा रोहणकार, पाणी पुरवठा सभापती म्हणून ओमप्रकाश शर्मा, शिक्षण समिती सभापती सौ. भाग्यश्री मानकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. जाकीयाबानो शे. अनिस यांची आणि उपसभापतीपदी सौ. दुर्गा हट्टेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड झालेले बहुतांश सभापती पालिकेत नगरसेवक म्हणून पहिल्यादांच विजयी झाले आहेत.  पालिकेतील प्रशासकीय कामकाजाच्या अनुभवाचा अभाव हा मुख्य अडथळा नवीन विषय सभापतींच्या समोर आहे.

नगर पालिकेत पाणी पुरवठा सभापती ओमप्रकाश शर्मा यांच्यासोबतच आरोग्य सभापती हिरालाल बोर्डे यांनी कामकाजाला प्रत्यक्षपणे सुरूवात केली असली तरी, अद्यापपर्यंत त्यांना त्यांचा कामाचा तसेच कार्यक्षेत्राचा आवाका लक्षात आला नसल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे शिक्षण सभापती भाग्यश्री मानकर, महिला व बाल कल्याण सभापती जाकीया बानो, उपसभापती दुर्गा हट्टेल आणि बांधकाम सभापती शोभाताई रोहणकार आपल्या कामाची चुणूक दाखवू शकल्या नाहीत. उच्च शिक्षित म्हणून भाग्यश्री मानकर यांची शिक्षण सभापतीपदी वर्णी लावण्यात आली आहे.  पालिकेच्या शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविण्याची संधी भाग्यश्री मानकर यांच्यासमोर आहे. तसेच शोभाताई रोहणकार आणि जाकीया बानो यांनाही आगामी काळात आपल्या पदांना न्याय देण्यासाठी झटावे लागणार असल्याचे दिसून येते.

आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकरांची शिष्टाई!

 विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता आपण भासू देणार नसल्याची ग्वाही राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी पालिकेतील सत्ताधाºयांना दिली आहे. शहरातील विकास कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला आहे. मात्र, याकामी हवी तशी गती मिळत नसतानाच, पक्षातंर्गत कुरबुरींमुळे भाऊसाहेब नाराज असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देण्यासाठी खामगाव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर स्वत: पालिकेत वेळ देत आहेत. आमदार आकाश फुंडकर यांनी शुक्रवारी पालिकेतील उपाध्यक्षांच्या दालनात नवनियुक्त विषय सभापतींसह भाजप पदाधिकाºयांची बैठक घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत, परिवर्तनाच्या विकासाच्या गाडीला वेग देण्याचा प्रयत्न केला. तसेच अंतर्गत नाराजी दूर करत काही नगरसेवकांची कानउघाडणीही केल्याची माहिती आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावNagar Bhavanनगरभवनnagaradhyakshaनगराध्यक्ष