शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांना अधिकाराची जाणीव झाल्यास विकास हाेईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:37 IST

मेहकर: गावातील सरपंचांना आपले अधिकार व कर्तव्य समजले तर त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी चांगले काम होईल असे मत खासदार ...

मेहकर: गावातील सरपंचांना आपले अधिकार व कर्तव्य समजले तर त्यांच्या हातून गावाच्या विकासासाठी चांगले काम होईल असे मत खासदार तथा केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले. मेहकर पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगारसेवक यांच्या कार्यशाळेत ते मार्गदर्शन करत होते. १३ ऑगस्ट रोजी ही कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी आमदार तथा पंचायत राज समिती अध्यक्ष संजय रायमुलकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर, युवासेना जिल्हा अधिकारी ऋषी जाधव, सभापती नीता देशमुख, बाजार समिती सभापती माधवराव जाधव, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपसभापती मीना म्हस्के, जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे, तेजराव जाधव, मनिषा चनखोरे, पंचायत समिती सदस्य राजू घनवट, वर्षा सुरेश मवाळ, प्रतिमा वानखेडे, कैलास खंडारे, भूजंगराव म्हस्के, निंबाजी पांडव, सुपाजी पायघन, रेवती काळे उपस्थित होते. आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, आपल्या पदानुसार प्रत्येक व्यक्ती ने काम करावे. हे कळण्यासाठी ही कार्यशाळा आहे. आम्ही विकास निधी देतो. तशी कामेही व्हायला हवी. कामे खेचून आणण्यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांनी समन्वयाने प्रयत्न करायला हवा. गावाला काय पाहिजे, ते ओळखून कामे करा. ग्रामसेवकांनी गावाला कुटुंब समजून झोकून दिले पाहिजे. प्रास्ताविक माजी उपजिल्हा प्रमुख दिलीप देशमुख तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, गटविकास अधिकारी आशिष पवार, उपविभागीय अभियंता दिनकर घुगे, ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर जोशी, फुटाणे, शाखा अभियंता महाजन, परिहार, बोरकर, घनतोडे, मगर, कायंदे, रमेश ठाकरे यांची भाषणे झाली. संचालन शेषराव काटकर यांनी केले.