मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या तीन ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे उद्घाटन करताना ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांच्या नेतृत्वात सिंदखेड या छोट्याशा गावाने माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनातून मागील काही वर्षांत गावाचा केलेला कायापालट हा प्रेरणादायी आहे. सत्यमेव जयते वॉटर कप फाउंडेशनच्या स्पर्धेतील राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा खडतर प्रवास हा गावाच्या एकजुटीचे प्रतीक आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रवीण कदम, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वैराळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची मागणी केली हाेती व गडकरी यांनी तत्काळ मान्यदेखील केली. या प्राप्त झालेल्या ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचे औपचारिक उद्घाटन राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य ॲड. गणेशसिंह राजपूत, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आरोग्य विभागाचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या एकजूटीतूनच विकासाची चळवळ : राहुल बोंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST