शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवराच्या विकासाला मिळणार गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 11:01 IST

Lonar crater : लोणार सरोवर विकास समितीची स्थापना केली असून या समितीची पहिली बैठक दोन आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: नागपूर खंडपीठाने सूचित केल्यानुसार अखेर राज्य शासनाने २४ ऑगस्ट रोजी लोणार सरोवर विकास समितीची स्थापना केली असून या समितीची पहिली बैठक दोन आठवड्यात होण्याची शक्यता आहे. तसे संकेत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान लोणार सरोवर व परिसराच्या विकासासाठी विविध  विभागामार्फत प्राप्त होणाऱ्या निधीतून तसेच काही योजनांच्या अभिसरणातून येथील विकास साधण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. लोणार विकासासाठी आधी गठित करण्यात आलेल्या तीन समित्यांवर नागपूर खंडपीठाने  एकच सर्वंकष समिती गठित करण्याचे सूचित केल्यानंतर राज्य शासनाने त्या दिशेने पाऊल टाकत ही समिती गठित केली आहे. १४ सदस्यीय समितीमधील दान अशासकीय सदस्यपदी नेमकी कोणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागून आहे.   एक प्रकारे शेगाव विकास आराखड्याच्या धर्तीवरच हा विकास होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. लोणार सरोवर विकासासाठी विविध विभागामार्फत प्राप्त होणारा निधी तसेच योजनांच्या अभिसरणातून २०५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत कामे करण्यात येणार होती. टप्पानिहाय भाग पाडून ही कामे करण्याचे निर्देश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ फेब्रुवारी रोजी लोणार सरोवरास भेट देऊन पाहणी करताना दिले होते. दपूर्वीच मान्यता दिलेल्या निधीमधून मधल्या काळात साडेसात कोटींची कामे झाली होती. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळांतर्गत ९१ कोटी २९ लाख रुपयांची कामे करण्यात येणार असून लोणार पालिका व जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातूनही जवळपास ६१ कोटी रुपयांची कामे करण्याचे त्यावेळी प्रस्तावित होते. सरोवरातील पिसाळ बाभूळ उच्चाटनासाठी ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चातून विभागीय वन्यजीव अकोला अंतर्गत काम करण्यात येत आहे. दुसरीकडे परिसराच्या विकासासाठी १५ कोटी रुपये खर्चून खासगी जमीन संपादनाचाही प्रस्ताव होता. या आराखड्यात मधल्या काळात काही बदलही करण्यात आले होते. आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखील नियुक्त करण्यात आलेल्या लोणार सरोवर विकास समितीच्या आगामी काळात होणाऱ्या बैठकीत आधीच्या आराखड्यात काय बदल करून त्याची अंमलबजावणी केल्या जाते याकडे लक्ष लागून आहे.

शेगाव विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर कामशेगाव विकास प्राधिकरणाच्या धर्तीवर लोणार सरोवर विकासाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार असून त्यासाठी या प्राधिकरणातंर्गत असलेले विशेष कार्य अधिकारी (अेाएसडी), संशोधन सहायक (गट ब) आणि एक लिपीक यांच्या सेवाही लोणार सरोवर विकासासाठी वर्ग केल्या जातील.

शेगाव विकास आराखड्याची ९६ टक्के कामेशेगाव विकास आराखड्याची २००९ पासून कामे सुरू असून गेल्या १२ वर्षात ९६ टक्के कामे पूर्ण झाली आहे. उर्वरित ४ टक्के कामे मार्गी लागल्यानंतर यासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारीवर्ग हा लोणार सरोवर विकासासाठी काम करेल, अशी माहिती शेगाव विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी शशिकांत माळी यानी दिली.

टॅग्स :lonar sarovarलोणार सरोवरbuldhanaबुलडाणा