शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतील नावाची निश्‍चिती करावी- पुलकुंडवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:16 IST

बुलडाणा: राज्य निवडणूक आयोगाकडून  प्राप्त आदेशान्वये  जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३  ऑक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याचे घोषि त करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे  वगळणे, नाव पत्त्यातील चूक दुरुस्त करणे, मतदार यादीतील  नावाची निश्‍चिती करण्यात येणार आहे. मतदारांनी प्रारूप मतदार  याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची निश्‍चिती करून  घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी केले.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण १९ लक्ष ११ हजार १२३ मतदार संख्याजिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राज्य निवडणूक आयोगाकडून  प्राप्त आदेशान्वये  जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम ३  ऑक्टोबर २0१७ ते ५ जानेवारी २0१८ पर्यंत राबविण्याचे घोषि त करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान मयत मतदारांची नावे  वगळणे, नाव पत्त्यातील चूक दुरुस्त करणे, मतदार यादीतील  नावाची निश्‍चिती करण्यात येणार आहे. मतदारांनी प्रारूप मतदार  याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या नावाची निश्‍चिती करून  घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार  यांनी केले.याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजेंद्र देशमुख व  निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. मतदारांची दोन  ठिकाणी नावे असल्यास ती त्वरित स्वत:हून नागरिकांनी रद्द  करण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, एकच नाव  मतदार यादीत दोन ठिकाणी असल्यास मतदारांनी एक नाव  त्वरित वगळावे. एकाच ठिकाणी नाव ठेवावे. मतदार यादीत दोन  ठिकाणी नाव असणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून  दोन ठिकाणी नाव असल्यास  एकच नाव ठेवावे. त्यासाठी प्रारूप मतदार यादी ३ ऑक्टोबर  २0१७ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, चूक दुरुस्त करणे यासाठी  विशेष मोहिमांचेसुद्धा आयोजन करण्यात येणार आहे. ते पुढे  म्हणाले, जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत राबविण्यात  आलेल्या विशेष मोहिमेत नवीन मतदारांनी चांगल्या प्रकारे प्र ितसाद दिला आहे. जिल्ह्यात ३५ हजार १२३ मतदारांची नोंदणी  करण्यात आली आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण मतदारसंख्या  १९ लक्ष ११ हजार १२३ मतदारसंख्या आहे. तसेच या मोहिमेत  १0 हजार ४४३ मतदार मयत आहेत. त्यांची नावे कमी करण्यात  येणार आहेत. 

असा आहे मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमप्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करणे : ३ ऑक्टोबर २0१७ , दावे  व हरकती स्वीकारण्याचा कालावधी : ३ ऑक्टोबर ते ३  नाव्हेंबर २0१७ पर्यंत, मतदार यादीमधील संबंधित भागाचे/से क्शनचे ग्रामसभा/ स्थानिक संस्था येथे वाचन व  आरडब्ल्यूएसोबत बैठक आणि नावांची खातरजमा ७ ऑक्टोबर  ते १३ ऑक्टोंबर २0१७ , विशेष मोहिमांचे आयोजन : ८ ऑ क्टोबर व २२ ऑक्टोबर २0१७ , दावे व हरकती निकालात  काढणे : ५ डिसेंबर २0१७ पर्यंत, डाटाबेसचे अद्यावतीकरण :  २0 डिसेंबर पर्यंत, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे ५ जानेवारी  २0१८.