शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

पाडळी शिवारातील हातभट्टीचे अड्डे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:32 IST

अवैधरित्यागावठी दारूची निर्मिती करणाºया हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून हे अड्डे नष्ट केले आहेत. या वेळी गावठी दारू काढणाºया चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच मोह सडवा दारू जागीच नष्ट केला. ही धडक कारवाई शनिवारी पाडळी शिवारात करण्यात आली. 

ठळक मुद्देचौघे ताब्यातराज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अवैधरित्यागावठी दारूची निर्मिती करणाºया हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून हे अड्डे नष्ट केले आहेत. या वेळी गावठी दारू काढणाºया चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच मोह सडवा दारू जागीच नष्ट केला. ही धडक कारवाई शनिवारी पाडळी शिवारात करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनात १५, १६ सप्टेंबर या दोन दिवसांत जिल्ह्यात अवैध दारू संदर्भात मास्क रेडचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, शनिवारी पाडळी शिवारातील देवीच्या मंदिराजवळील दरीमध्ये काही जण गावठी दारू काढत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकातील कर्मचाºयांनी धाड टाकली असता, पाडळी येथील भीमराव राजू मगर, सागर राजू मगर, संजय भीमराव पगारे अविनाश जाधव हे चार जण हातभट्टीची दारू काढताना दिसून आले. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून १५ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोहाचा सडवा दारू जागेवरच नष्ट केली. ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण, विशालसिंग पाटील अमोल सुसरे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक चव्हाण करत आहेत.