शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

तीस एकरावरील केळी उद्ध्वस्त

By admin | Updated: December 15, 2014 00:58 IST

शेतक-यांचे लाखोंचे नुकसान : दहिगाव-उ-हा परिसरात गारपिटीसह चक्रीवादळाचा फटका.

मोताळा (बुलडाणा) : तालुक्यातील दहिगाव व उर्‍हा परिसरात १३ डिसेंबरच्या रात्री झालेल्या चक्रीवादळासह गारपीट व पावसामुळे परिसरातील शेतकर्‍यांची जवळपास तीस एकरावरील केळींची बाग भुईसपाट झाली आहे. त्यामुळे दहिगाव व उर्‍हा परिसरातील ११ शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मोताळा तालुक्यातील दहिगाव व उर्‍हा शिवारामध्ये अनेक शेतकर्‍यांनी केळी पिकाची लागवड केली असून, या पिकाला १८ ते २२ महिन्यांचा कालावधी लागतो. जवळपास १ लाखापर्यंत प्रती हेक्टरी खर्च येणार्‍या या पिकाला जगवण्यासाठी २२ महिन्यांच्या कालावधीत शेतकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते; परंतु १३ डिसेंबरच्या रात्री ८ वाजेच्या दरम्यान झालेल्या दहिगाव व उर्‍ह शिवारात चक्रीवादळासह पाऊस व गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या केळीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तास चक्रीवादळाचे थैमान, त्यातच १५ मिनिटांपर्यंत गारपीट व वेगाच्या वार्‍यासह झालेल्या पावसामुळे ऐन कटनवर आलेले शेतकर्‍यांचे (कांदय़ा बाग) केळीची हजारो झाडे फळांसह जमीनदोस्त झाली. यामध्ये दहिगाव येथील शेतकरी नारायण डिके यांची २५00 हजार झाडे, मनोज चौधरी यांची २ हजार, प्रभाकर डिके यांची १७00, भगवान डिके यांची १000, कैलास शेळके यांची १५00 झाडे, तर उर्‍हा येथील शेतकरी शंकरसिंग राजपूत यांची ३ हजार, राजेंद्रसिंग राजपूत यांची ३ हजार, महादेवसिंग राजपूत यांची २ हजार, देवीदास नेरकर यांची ३ हजार, रामदास नेरकर यांची १५00, अनिता विठ्ठलसिंग राजपूत यांची ३ हजार केळीची झाडे फळासह वारा-पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. कधी नव्हे ते सद्य:स्थितीत केळीला प्रती क्विंटल १२00 पर्यंत भाव आहे; मात्र १३ डिसेंबरचा रात्रीचा वादळी पाऊस अनेक शेतकर्‍यांना आर्थिक फटका देऊन गेला. यावर्षीच्या अत्यल्प पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांचे कापूस, सोयाबीन पीक हातातून गेले आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेले तालुक्यातील थोडेफार शेतकरी भाजीपाल्यासह केळीचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र निसर्गाच्या बेमोसमी अवकृपेमुळे काल झालेल्या वादळी पावसात जवळपास २४ ते २५ हजार केळींची लदबदलेली बाग जमीनदोस्त झाली. यामुळे सदर कुटुंबांची अवस्था बिकट झाली असून, शेतीशिवाय दुसरी मिळकत नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.