शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव पालिकेच्या विरोधाला न जुमानता नालीचे बांधकाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:12 IST

खामगाव :  पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन स्थलांतरीत करण्यापूर्वी राष्ट्रीय महामहामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास पालिकेने तीव्र विरोध दर्शविला.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन स्थलांतरीत करण्यापूर्वी राष्ट्रीय महामहामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास पालिकेने तीव्र विरोध दर्शविला. मात्र, पालिकेच्या विरोधाला न जुमानता संबंधीत कंत्राटदाराकडून रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या दुतर्फा नाली बांधकाम केले जात आहे. त्यामुळे पालिकेने कंत्राटदारावर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

खामगाव शहरातून जाणाºया राष्टीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास गेल्या महिनाभरापासून सुरूवात करण्यात आली. यामध्ये  बाळापूर नाका ते विकमसी चौक आणि विकमसी चौक ते टिळकपुतळा पर्यंत नाली बांधकाम करण्यात येत आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत न करताच, नाली बांधकाम करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रोडची संरचना करताना चक्क सेंटरलाईन सोडून काम केले जात आहे. परिणामी, शासकीय कार्यालयांसोबतच सर्व सामान्य आणि या रस्त्यावरील व्यापारीही वेठीस धरल्या जात आहे.  कंत्राटदाराच्या मनमानीचा प्रत्यय पालिका प्रशासनालाही येत असून, पालिकेने यापूर्वीच कंत्राटदाराचे काम थांबविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाला पत्र दिले आहे. या पत्राची प्रतिलिपी जिल्हाधिकाºयांनाही सादर केली आहे. मात्र, पालिकेच्या विरोधाला न जुमानता या कंत्राटदाराकडून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत, नालीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे सोमवारी पुन्हा पालिकेने संबंधीत कंत्राटदाराला दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे.

चौकट...

कंत्राटदाराची मनमानी; नागरिक वेठीस!

रस्त्याची संरचना करताना कंत्राटदाराकडून मनमानीपध्दतीने सेंटर लाईन बदलण्यात येत आहे. पाणी पुरवठ्याची पाईपलाईन स्थलांतरीत न करताच नालीचे बांधकाम केले जात आहे. त्यामुळे पाईप लाईनला गळती लागल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. परिणामी, पाणी पुरवठा प्रभावित झाल्याने, अनेक भागातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. एंकदरीत कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे सामान्यांसह शासकीय कार्यालयेही वेठीस धरल्या जात आहे.

रात्रीच्या अंधारात नालीचे बांधकाम!

पालिका प्रशासनाने बांधकाम थांबविण्याचे पत्र दिल्यानंतरही जान्दू कन्ट्रक्शन कंपनीकडून रात्रीच्या अंधारात नालीचे काम करण्यात आले. रविवारी रात्री सोबतच सोमवारीही काही ठिकाणी कंत्राटदाराकडून काम करण्यात येत होते. पाईपलाईन स्थलांतरीत न करताच काम करण्यात येत असल्याने, पालिका प्रशासनाच्या पत्राकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाकडून कानाडोळा केल्या जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.  

टॅग्स :khamgaonखामगाव