बुलडाणा : तालुक्यातील ३५ शाळा आयएसओ करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने केला आहे़ या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आयएसओ मानांकित जिल्हा परिषद शाळा वरुड येथे ध्यास गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत प्रेरणा सभा १० सप्टेंबर राेजी घेण्यात आली़
अजिंठा डोंगर रांगांमध्ये वसलेल्या बुलडाणा तालुक्यातील वरुड येथील जिल्हा परिषद शाळेला नुकतेच आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. बुलडाणा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सर्व शिक्षकांना प्रेरणा मिळावी म्हणून कार्यशाळा घेण्यात आली. बुलडाणा पंचायत समिती येथे नुकतेच रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी संजय पवार व शिक्षण विस्तार अधिकारी वंदना टाकळकर यांची या वेळी उपस्थिती हाेती. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम भुते, आदर्श शिक्षिका अरुंधती पवार व संपूर्ण शिक्षकवृंद यांचा सत्कार केला. आदर्श शाळा बोरखेडी येथील राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अनिल चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले. आदर्श शिक्षक संदीप पवार यांनी संचालन केले. आभार कैलास उबरहंडे यांनी मानले़. या वेळी तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, वरुड येथील ग्रामपंचायत व शाळा समितीचे सर्व पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते़