शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले

By admin | Updated: October 30, 2014 23:59 IST

बुलडाणा जिल्ह्यात २५ दिवसात १0 मृत्यू : आरोग्य प्रशासनाचे तापावर नियंत्रण नाही.

बुलडाणा : वातावरणात होणार्‍या बदलामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने जिल्ह्यात डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले आहे. डेंग्यूसदृ्श तापाचे बरेच रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. बुलडाणा शहरासह तालुक्यातील कोलवड, धाड, लोणार, मेहकर तालुक्यातील नागझरी, डोणगाव, देऊळगावराजा, चिखली येथे डेंग्यू सदृश तापाने गेल्या पंचविस दिवसात १0 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र डेंग्यूच्या भीतीचे वातावरण आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाला मात्र अद्यापही डेंग्यू तापावर नियंत्रण मिळविण्यात यश आले नाही. गेल्या आठवड्याभरापासून वातावरण मोठा बदल झाला आहे. दुपारी कडक उन्ह असते, तर रात्री थंडी पडत असते. त्यात अस्वच्छतेची भर आहे. शहरांशिवाय ग्रामीण भागात सर्वत्र घाण साचत आहे. यामुळे डासांची संख्या वाढून मलेरिया, टायफाईड, डायरिया, निमोनिया आणि डेंग्यूसारखे आजार शहरात तोंड वर काढत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि खासगी रुग्णालयात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागातील हिवताप विभागाकडून डेंग्यू संशयीत काही रुग्णांच्या रक्तजल नमुने तपासणीसाठी अकोला येथे पाठविले आहे. तर काही खासगी रुग्णालयात रुग्णांची तपासणी केली असता त्यांना डेंग्यू झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. जिल्ह्यात तापाच्या साथीवर नियंत्रण मिळविल्याचा दावा करणार्‍या आरोग्य विभागाला डेंग्यूच्या धोक्यावर मात करता आलेली नाही

. *आरोग्य मोहीम कागदावरच

        डेग्यूसदृश तापाने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये बुलडाणा, लोणार, मेहकर तालुक्यात सहा लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्हाभरात आरोग्य विभागाच्या हिवताप विभागाने शहर आणि ग्राम स्तरावर स्वच्छता मोहीम तसेच शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना घेऊन जनजागृती मोहीम हाती घेतली; मात्र ही मोहीम आता कागदावरच राहिली आहे. सध्या अशी मोहीम तातडीने राबविण्याची गरज आहे.