शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे ११ संशयित रुग्ण आढळले!

By admin | Updated: September 26, 2016 02:46 IST

वातावरणाचा परिणामामुळे व्हायरलचा प्रकोपही वाढला!

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. २५- जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी-जास्त येणारा पाऊस व दोन दिवसांपासून दमदार पाऊस झाल्यामुळे 'व्हायरल'च्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी डेंग्यूचे संशयित रुग्णही आढळत असून, ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून व्हायरलचा प्रकोप वाढला असून, या महिन्यात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. दिवसा ऊन-पाऊस आणि सकाळ-सायंकाळी दमट वातावरणामुळे व्हायरलचा प्रकोप वाढला आहे. खासगी हॉस्पिटलसह जिल्हा सामान्य रुग्णालयात खोकला, ताप आणि श्‍वसनाचे आजार असलेल्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. मागील वर्षी डेंग्यूचे रुग्ण आढळले नव्हते. यावर्षी मागील सहा महिन्यात जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाकडून २ लाख १0 हजार ७९४ रक्त नमुने गोळा करून तपासणी करण्यात आली होती. मात्र, त्यात मलेरियाचे १६ रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूचा एकही रुग्ण आढळला नाही. सध्या डेंग्यूचे ११ संशयित रुग्ण आढळले असून, ते विविध खासगी तसेच औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे परिसरात डेंग्यूविषयी नागरिकांमध्ये भीती कायम आहे. वातावरण विषाणूंसाठी पोषकऋतू बदलल्याने सर्दी-खोकला व घशाचा संसर्गाने डोके वर काढले आहे. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले, तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण विषाणूंसाठी पोषक आहे. विशेषत: पावसाच्या उघडझापमुळे शरीरावर याचा प्रभाव पडतो. लहान मुलांवर याचा परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे व्हायरलचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या शिवाय पावसामुळे जागोजागी पाण्याची डबकी तयार होऊन डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने कीटकजन्य आजाराचे रुग्णही आढळून येत आहेत.