शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लघु प्रकल्प रस्त्यावरील भूमाफियांच्या अतिक्रमणाविरोधात तहसील कार्यालयासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2023 13:06 IST

धरणावर जाण्याकरीता गावकऱ्यांना विहिरीवर जाण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. 

लघु प्रकल्पाच्या रस्त्यावरील बेकायदा अतिक्रमण तात्काळ हटवून 16 गाव पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर जाण्या- येण्याचा रोड रस्ता तात्काळ मोकळा करुन द्यावा या मागणीसाठी गावकऱ्यांच्या वतीने खामगाव येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लांजुड गावाची कायमस्वरुपी पाणी पुरवठ्याची विहिर लघु प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात असून विहिरीवरील पाणीपुरवठ्याच्या मोटारी चालू-बंद करण्याकरीता जाणे-येणेसाठी रस्ता असून सुध्दा तो रस्ता अवैधरित्या काही भूमाफीयांनी अडविल्यामुळे तेथे जाणे-येणे करता येत नाही, पावसाळ्यात धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहते. धरणावर जाण्याकरीता गावकऱ्यांना विहिरीवर जाण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते. वेळ प्रसंगी पिण्याच्या पाण्यापासून गावातील नागरिकांना वंचित रहावे लागते.

लांजुड परिसरातील शासकीय रस्ता 1995 मध्ये जिल्हाधिकारी संपादित केला होता, त्या खामगाव येथील काही भूमाफियांनी रस्ता अडवून त्यावर तार कंम्पाऊंड करून अतिक्रमण करण्यात आले आहे. तसेच हायवे लगत असलेल्या सिलिंग गट नं.62/1 या महाराष्ट्र शासनाच्या सिलिंग जमिनीवर सुध्दा तार कम्पाऊंड करुन बेकायदेशीर कब्जा करुन अतिक्रमण केलेले आहे. तात्काळ कारवाई करुन अतिक्रमण कैलेला रस्ता मोकळा करुन द्यावा व या प्रकरणाची विशेष पथक नेमून व सखोल चौकशी करुन चौकशी अंती फौजदारी स्वरुपाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास गावकरी स्वतः अतिक्रमण काढतील असा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा