शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पेंटिंग बोर्डची मागणी घटली; पेंटरच्या हाताला कामच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST

रहेमान नवरंगाबादी लोकमत न्यूज नेटवर्क लोणार : सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ आदी प्रसंगी पेंटिंग बोर्ड बनविण्याची प्रथा ...

रहेमान नवरंगाबादी

लोकमत न्यूज नेटवर्क

लोणार : सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रम, लग्न समारंभ आदी प्रसंगी पेंटिंग बोर्ड बनविण्याची प्रथा सध्याच्या डिजिटल युगात मोडीत निघत आहे. शहरातील बाजारपेठेमध्ये मागील अनेक वर्षांपासून पेंटिंग व्यवसायाचे काम करणारे, पेंटिंग कलेवर उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने अनेक घटकांना मदतीचा हात दिला असला तरी पेंटरना अजूनही मदत देण्यात आलेली नाही़.

लाेणार येथील बाजारपेठेत केशव आघाव यांच्यासह अनेकांनी पेंटिंग व्यवसाय सुरू केला हाेता, मात्र गेल्या काही वर्षांपासून डिजिटल युग आल्याने पेंटिंग बाेर्डची मागणी घटली आहे. शहरात पेंटिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू होता व पेंटरनासुद्धा व्यवसाय करण्यास परवडत होते. मात्र, डिजिटल फलक, बॅनर, फ्लेक्स आल्यामुळे पेंटिंग व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातूनच काम मिळाले तरी कामाचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे पेंटिंगचा व्यवसाय सोडून दुसरे काम हाती घेणाऱ्यांची संख्या ९५ टक्के असल्याचे विदारक चित्र केशव आघाव यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.

काेराेनाचाही बसला फटका

पेटिंग करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने शहरातील अनेक पेंटर हे दुसऱ्या व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. तसेच मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमध्ये पेंटिगची मागणी घटली आहे.

पुन्हा ‘अच्छे दिन’ची आशा

डिजिटल बोर्ड आकर्षक व स्वस्त असले तरी त्यांचे आयुष्य कमी आहे. पेंटर जे बोर्ड हाताने रेखाटतात ते चिरकाल टिकून राहतात, मात्र लोकांना हे कळत नाही. आज ना उद्या लोकांना हे कळेल आणि पुन्हा आमच्या व्यवसायाला सोन्याचे दिवस येतील, असा विश्वास पेंटरनी व्यक्त केला.