शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST

राहेरी बु. : चार ते पाच हजार लाेकसंख्या असलेल्या राहेरी बु. येथे स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना ...

राहेरी बु. : चार ते पाच हजार लाेकसंख्या असलेल्या राहेरी बु. येथे स्मशानभूमीच नसल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना कसरत करावी लागते. स्मशानभूमीसाठी निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे स्मशानभूमीचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

राहेरी बु. गावात हिंदू स्मशानभूमीच नाही. त्यामुळे औरंगाबाद-नागपूर या राज्य महामार्गावर खडकपूर्णा नदीवरील पुलाच्या खाली मृतकांवर अंत्यसंस्कार करावे लागतात. हे अंतर गावापासून ‌एक ते दीड किलोमीटर आहे. त्यामुळे नागरिकांना एक ते दीड किलोमीटचे अंतर राष्ट्रीय महामार्गाने पार करावे लागते. महामार्गावरून जात असताना वर्दळीचे व मोठ्या प्रमाणावर वाहने चालतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाखालील स्मशानभूमीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये मृतकांवर अत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाइकांना कसरत करावी लागते. ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्याच्या विहिरीजवळील जागेवर हिंदू स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने पाच लाख रुपयांचा निधी स्मशानभूमीसाठी मंजूर करून आणलेला आहे. त्या निधीचा वापर करून लवकरात लवकर त्या जागेवर स्मशानभूमीचे काम सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

मराठा समाजाच्या स्मशानभूमीसाठी मागील ग्रामपंचायतीने पाच लाख रुपये निधी मंजूर केला आहे. आम्ही ग्रामपंचायतचा ठराव घेऊन गावकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ व हे पाच लाख रुपये स्मशानभूमीसाठीच वापरले जातील.

रवी बरंडे, सरपंच, राहेरी बु.

गावात मराठा समाज मोठा असून, या ठिकाणी मराठा समाजाची स्मशानभूमी नाही, ही एक शोकांतिका आहे. आता पाच लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून स्मशानभूमीचे बांधकाम आरक्षित जागेवर करावे.

धनंजय देशमुख, राहेरी बु.