शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कारागीरांना मदत देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:35 IST

बुलेट लंपास, गुन्हा दाखल बुलडाणा : शहरातील महाराणा प्रताप चौकामधून अज्ञाताकडून पंक्चर असलेली बुलेट लंपास करण्यात आली आहे. संचारबंदीचा ...

बुलेट लंपास, गुन्हा दाखल

बुलडाणा : शहरातील महाराणा प्रताप चौकामधून अज्ञाताकडून पंक्चर असलेली बुलेट लंपास करण्यात आली आहे. संचारबंदीचा फायदा घेत शहरातील सर्क्युलर रोडवरील महाराणा प्रताप चौकामधून (एमएच २८ बीडी ८७८२) या क्रमांकाची बुलेट २४ मे रोजी रात्री चोरीस गेली आहे. याप्रकरणी पाेलिसात तक्रार देण्यात आली आहे़

बिरसिंगपूर येथील शिबिरात ३१ युवकांचे रक्तदान

बुलडाणा : कोरोना काळात बुलडाणा जिल्ह्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मान्यवरांनी केलेले आवाहन लक्षात घेता, तालुक्यातील बिरसिंगपूर येथील शिवप्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले़ यावेळी ३१ जणांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

नृत्य परिषदेने दिला मदतीचा हात

बुलडाणा : कोरोना वैश्विक महामारीने सगळ्यांचे जगणे अवघड होऊन बसले आहे. पाहिला लॉकडाऊन संपल्यानंतर जगण्याची आशा पल्लवित झाल्या असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे पुन्हा संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे अनेकांची परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीत नृत्य कलाकारांचे हाल होऊ नये यासाठी नृत्य परिषदेने त्यांना मदतीचा हात दिला आहे.

काेविड व्हॅक्सिनवर वेबीनार

देऊळगावराजा : येथील समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांसाठी ‘कोविड व्हॅक्सिनेशन’ या विषयावरचा वेबिनार नुकताच पार पडला. प्राचार्य प्रफुल्ल ताठे यांच्या संकल्पनेतून व कार्यक्रम संयोजक प्रा. रोहित जाजू यांच्या प्रयत्नाने वैभव फुंडे, कोव्हॅस लॅब, बेंगलोर, यांच्या मार्गदर्शनात वेबिनार पार पडला. याप्रसंगी सविस्तर मार्गदर्शन वैभव फुंडे यांनी केले.

अवैध गुटखा विक्री सुरूच

डोणगाव : काेराेना संक्रमण वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, तरीही डाेणगाव परिसरात गुटखा विक्री सुरूच असल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत आहे़

ग्रामीण रुग्णालयात युवकांनी केली स्वच्छता

हिवरा आश्रम : येथील जनसेवा हीच ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून तरुणांसह ग्रामस्थांनी २० मे रोजी एकत्र येऊन ग्रामीण रुग्णालयात साफसफाई करून लोकसेवेचा आदर्श निर्माण केला. तरुण स्वयंसेवकांनी इमारतीची साफसफाई केली; तर इमारत परिसरातील वाढलेली काटेरी झाडेझुडपे श्रमदान करून साफ केली.

१२६५ पालकांनी केली पुस्तके परत

बुलडाणा : सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत पुस्तके दिली जातात. जुन्या पुस्तकांचा पुनर्वापर करण्यासाठी गतवर्षीची पुस्तके परत करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने पालकांना केले आहे़. या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १२६५ पालकांनी पुस्तके परत केली आहेत.

लोकसहभागातून विलगीकरण कक्ष

धामणगाव बढे : येथील सहकार विद्यामंदिर येथे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन तथा लोकसहभागातून विलगीकरण कक्षाचे उद्घाटन तहसीलदार समाधान साेनाेने यांच्याहस्ते करण्यात आले़. विलगीकरण कक्षासाठी दातृत्वाचे पालकत्व घेणाऱ्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले.

इंधन जमा करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड

किनगाव जट्टू : शासनाने मोठा गाजावाजा करून पर्यावरणयुक्त गाव संकल्पना चूलमुक्त धूरमुक्त अभियान राबवून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सबसिडीवर स्वयंपाकाचे गॅस दिले; परंतु गत चार महिन्यांत गॅसची किंमत वेगाने वाढत असल्याने सरपण गाेळा करण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे़

बैलांद्वारे नांगरणी झाली दुर्मीळ

धामणगाव धाड : कृृृषी व्यवसायात उन्हाळी नांगरटीला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. अलीकडील काळात यांत्रिकीकरणाच्या मदतीने शेतीच्या मशागतीला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे यापूर्वी बैलांच्या मदतीने होणाऱ्या मशागती अगदी नगण्य होत चालल्या आहेत.

घरचे साेयाबीन बियाणे वापरा

बुलडाणा : सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक आहे. या पिकाचे सर्वच वाण सरळ वाण आहेत. त्यामुळे दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील २ वर्षांपर्यंत वापरात येते. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.