जिल्हा सामान्य रुग्णालयातील वेगवेगळे घोटाळे भ्रष्टाचार प्रकरणांत दोषी आढळलेले कर्मचारी यांना यापूर्वी त्याच ठिकाणी दुसरा टेबल देऊन कामावर ठेवले होते. दरम्यान, याप्रकरणी उपसंचालक यांना निलंबित करण्याची मागणी संचालक मुंबई यांच्याकडे केल्याने उपसंचालक डॉ. फारूकी यांचे धाबे दणाणले. त्यांनी तत्काळ उपसंचालक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बुलडाणा येथे पाठविले. प्राथमिक चौकशी अहवालात साहित्य खरेदीत अनियमितता दाखवून डॉ. फारूकी यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी ३१ डिसेंबर २०२० ला दोन कर्मचारी निलंबित करून आपल्या निलंबनाची कार्यवाही टाळली. परंतु, साहित्य खरेदी घोटाळ्यासह आणखी सागवान विक्री घोटाळा, सेंट्रल ऑक्सिजन पाइपलाइन घोटाळा व लेखापरीक्षण पथक घोटाळा याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी एन.एस.यू.आय. जिल्हाध्यक्ष शैलेश खेडकर यांनी संचालक मुंबई यांच्याकडे केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST