डोणगाव : लोणीगवळी येथे दोन आरोपींनी येऊन उपकेंद्राची तोडफोड करुन कर्मचाºयाला जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना दोनदा घडल्याने येथील कर्मचारी भितीच्या वातावरणात काम करीत असून, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करुन कर्मचाºयांना संरक्षण प्रदान करावे, अशी मागणी डोणगाव पोस्टेचे ठाणेदार यांना सबआॅर्डीनेअर इंजिनियर असोसिएशन व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विज कामगार फेडरेशन (इंटक) एमएसई वर्कस फेडरेशन, आऊटसोर्स कामगार सेना यांच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. डोणगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम लोणीगवळी येथे विद्युत वितरण कंपनीचे ३३ के.व्ही. उपकेंद्र आहे. या उपकेंद्रावर दोन जणांनी येऊन यंत्रचालक बालू परशराम नागोलकर यास शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन खिडक्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली. लोणीगवळी येथील उपकेंद्रावर बालू परशराम नागोलकर हे यंत्रचालक कर्तव्यावर असताना आरोपी गजानन प्रल्हाद काटे रा.लावणा व राजू सदाशिव चंदनशिवे रा.भोसा या दोघांंनी डोंबळे यांनी केलेल्या केसेस मागे घ्यायला सांगा, नाहीतर त्यांना आम्ही जीवाने मारु, असे म्हणून नागोलकर यांना शिवीगाळ केली. तसेच कार्यालयाच्या काचा फोडून शासकीय मालमत्तेचे ३५०० रुपयाचे नुकसान केले. फिर्यादीच्या तक्रारीवरुन आरोपी विरुद्ध कलम ३५३, ५०४, ५०६, ३४ भादंवि व सहकलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय अशोक नरोटे हे करीत आहेत.
जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 13:19 IST
डोणगाव : लोणीगवळी येथे दोन आरोपींनी येऊन उपकेंद्राची तोडफोड करुन कर्मचाºयाला जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटना दोनदा घडल्याने येथील कर्मचारी भितीच्या वातावरणात काम करीत असून, यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करुन कर्मचाºयांना संरक्षण प्रदान करावे, अशी मागणी डोणगाव पोस्टेचे ठाणेदार यांना सबआॅर्डीनेअर इंजिनियर असोसिएशन व महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विज कामगार ...
जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
ठळक मुद्देआऊटसोर्स कामगार सेना यांच्यावतीने निवेदन