मेहकर : पंचायत समिती मेहकरअंतर्गत येत असलेल्या अंजनी बु. येथील ग्रामपंचायतीमध्ये माेठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. या प्रकरणाची चाैकशीही झाली आहे. मात्र, दाेषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. दाेषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास पंचायत समितीसमाेर २६ ऑगस्ट राेजी घंटानाद व थाली बजाव आंदाेलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अंजनी बु. येथील ग्रामपंचायतीमध्ये बोगस नमुना ८, घर कर, पाणीपट्टी कर पावत्या, तसेच बोगस घरकुल व शाैचालय यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्यासाठी वेळाेवेळी आंदाेलनेही केली हाेती. त्यानंतरही दाेषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे, कुंभकर्णी झाेपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी २६ ऑगस्ट राेजी घंटानाद आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर उषाबाई त्र्यंबक नागोलकर, समाधान जानकीराम पदमने, अमोल जनार्धन शेवाळे, रामभाऊ नामदेव राऊत, विष्णू शेषराव ढोले, गजानन नारायण नागोलकर, कविता त्र्यंबक नागोलकर, शंकर नामदेव पायघन, दिलीप प्रभाकर आल्हाट, अशोक दत्तात्रय नागोलकर, ओम बळीराम ढोले, विशाल लाड व इतरही अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्ऱ्या आहेत.