शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दिड वर्षापासून कामे खोळंबली!

By admin | Updated: November 18, 2016 18:51 IST

बुलडाणा जिल्ह्यातील विविध योजना निधी आभावी रखडल्या!

बुलडाणा, दि. १८- केंद्राकडून विविध योजनांसाठी राज्याला मिळणारा निधी हा कमी झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील विविध योजनांची कामे खोळंबली आहे. त्यामुळे कृषी, शिक्षण, आरोग्य, बांधकाम आदी विभागांना कामे करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक पातळीवर अधिकार्‍यांना कसरत करावी लागणार आहे.केंद्र शासनाकडून राज्यात विविध योजना सुरु होत्या. यातील बर्‍याच योजना कॉग्रेस सरकारच्या काळापासून राबविल्या जात. अनुदानासाठी केंद्र ६0 टक्के व राज्य ४0 टक्के असा हिस्सा ठेवण्यात आला. सत्ता बदल झाल्यानंतर केंद्र शासनाकडून राज्यात राबविल्या जाणार्‍या योजनेला मिळणार निधी टप्प्याटप्प्याने कमी केला. तर काही योजनेचा निधी थेट बंद केले. परिणामी योजना राबवितांना राज्य शासनाच्या तिजोरीवर भार वाढल्यामुळे जिल्हास्तरावरील विविध योजनांची कामे प्रभावित झाली. पंतप्रधान ग्रामसडक योजना, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, एआयबीपीतंर्गत येणार्‍या सिंचन प्रकल्प, जलयुक्त शिवार, राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, सिंचन विकास योजना कामे त्यामुळे अडचणीत आली आहेत.   जिल्ह्यात सुरु असलेल्या योजनाराज्या व केंद्र यांचा ५0:५0 टक्के निधीचा सहभाग असलेल्या योजनाची कामे जिल्ह्या सुरु आहे. मात्र त्यांनाही दिड वर्षापासून पुरेसा निधी मिळला नाही. यात राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, जलयुक्त शिवार योजना, राष्ट्रीय ग्रामीण माध्यान्ह भोजन योजना, इंदिरा आवास योजना यांचा समावेश आहे.निधी देणे बंद केलेल्या योजनाराजीव गांधी पंचायत, सशक्तीकरण अभियान, मागास विभाग विकास निधी,राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स प्लान, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, ६000 आदर्श शाळांची उभारणी, राष्ट्रीय अन्न प्रक्रिया मिशन यांचा निधी केंद्रांने बंद केल्यामुळे योजनांची कामे पुर्णपणे बंद झाली आहे. निधीची प्रतिक्षाजिल्ह्यातील विकासात्मक योजनांसाठी शासनाकडून जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात एक कोटी व दुसर्‍या टप्प्यात दोन कोटी असा एकूण तीन कोटी रुपये निधी मिळाला. मात्र गत दिड वर्षापासून दोन कोटी ६६ लाखाच्या निधीची प्रतीक्षा आहे.