शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डी.एड्. कॉलेज पडताहेत ओस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 11:44 IST

D.Ed. College News जिल्ह्यातील आठ अध्यापक विद्यालयात शासकीय व व्यवस्थापन कोट्यातील एक जागा भरण्यात आलेली नाही.

ठळक मुद्देडी.एड्. होऊन बेरोजगार होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मुलांचाही डी.एड्.कडे जाण्याचा ओढा हळूहळू कमी होत गेला.

लाेकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एड‌्.) प्रथम वर्षाच्या ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. परंतु २०२० -२१ या शैक्षणिक वर्षाकरिता आतापर्यंत जिल्ह्यातील आठ अध्यापक विद्यालयात शासकीय व व्यवस्थापन कोट्यातील एक जागा भरण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांनी डी.एड‌्.कडे पाठ फिरवल्याने डी.एड‌्. कॉलेज ओस पडत आहेत.बारावी झाल्यानंतर अडीच वर्षात प्राथमिक शिक्षण पदविका घेऊन शिक्षक होण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठा कल होता. त्यामुळे जिल्ह्यात २०१० पर्यंत खैरातींप्रमाणे अध्यापक विद्यालयांना मान्यता देण्यात आली. परिणामी वर्षात लाखो विद्यार्थी डी.एड. होऊन बाहेर पडत होते. डी.एड्धारकांची संख्या झपाट्याने वाढत गेली, त्यातुलनेत शाळेवर शिक्षकांच्या जागा कमी निघत गेल्या. २०१० नंतर शिक्षक भरती बंद केली. त्यामुळे डी.एड्. होऊन बेरोजगार होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षक भरती विस्कळीत झाल्याने व डी.एड्. होऊनही शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेवर लागण्याचे स्वप्न अपूर्ण राहत असल्याने नवीन मुलांचाही डी.एड्.कडे जाण्याचा ओढा हळूहळू कमी होत गेला. सध्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता प्राथमिक शिक्षण पदविका प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाइन प्रवेशाच्या तीन फेऱ्या होऊनही अनेक जागा रिक्तच आहेत.

डी.एड्साठी विद्यार्थ्यांचा कल कमी झालेला आहे. त्यामुळे संस्थेकडून काॅलेज बंद करण्याचा प्रस्ताव आल्यास ते विद्यालय बंद केले जाऊ शकते. आतापर्यंत मराठी माध्यमाचे ३०६ प्रवेश व उर्दू माध्यमाचे १२० प्रवेश पूर्ण झालेले आहेत.  - डाॅ. विजयकुमार शिंदे, प्राचार्य,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा.

२०१० नंतर शिक्षक भरतीला मोठा विलंब झाला. त्यानंतर डी.एड‌्. करूनही टीईटी अनिवार्य करण्यात आली. टीईटी घेतल्यानंतरही भरती लवकर होत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा डी.एड्. करण्याकडे ओढा कमी झाला. -संतोष मगर, संस्थापक अध्यक्षडीटीएड स्टुडंट असोसिएशन

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्रcollegeमहाविद्यालय