शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

कृउबासमध्ये धान्यमाल घेऊन येणा-यांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 19:49 IST

लोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. 

ठळक मुद्देदुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षी पिकांचे नुकसानअपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतक-यांनी फिरवली पाठ 

किशोर मापारीलोकमत न्यूज नेटवर्कलोणार : यावर्षी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य घेऊन येणाºयांची संख्या घटली. अपेक्षेप्रमाणे धान्याला भावही नसल्यामुळे शेतकºयांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्य आणण्यास पाठ फिरवली आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. मागील चार वर्षांपासून तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. उसनवारीच्या पैशावर शेतकºयांनी बि-बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या. मात्र, शेतकºयांना अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. खरीपासह रबी पिकांनीही दगा दिल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. सध्या लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला २५५० ते २८५० रुपये भाव आहे. पेरणी व मजुरीचा खर्च हि निघत नसल्याने शेतकºयांनी धान्य साठवून ठेवले असून काही ठिकाणी मजूर मिळत नसल्याने सोयाबीन मजुराच्या प्रतीक्षेत शेतात उभी आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकºयाच्या हातात पैसे नसल्यामुळे दिन दीन दिवाळी असे म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाअभावी सोयाबीनच्या शेंगातील दाणे भरलेच नाही. ज्वारीसारख्या सोयाबीनचा दाणा राहिल्याने उत्पन्नात प्रचंड घट झाली आहे. यावर्षी चांगल्या प्रतीच्या जमिनीत एक ते दोन पोते तर काहींना ४० ते ५०  किलो उत्पादन होत आहे. यामुळे बºयाच शेतकºयांनी शेतातून सोयाबीन काढण्यासही उत्साह दाखविला नाही.

गतवर्षी सात हजार यावर्षी केवळ दोन हजार क्विंटल आवकयावर्षीच्या खरीप हंगामात निसर्ग शेतकºयावर कोपला असून, पावसाने ऐनवेळी दांडी मारल्याने शेतमाल उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. याचा थेट परिणाम बाजार समित्यांमध्ये होणाºया उलाढालीवर झाला आहे. गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात ७ हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक होती. मात्र यंदा केवळ २ हजार क्विंटलची आवक असल्याने सोयाबीनची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे.