लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोणत्याही परिस्थितीत विचलित न होता, दिशा ठरवून अभ्यास केल्यास स्पर्धां परीक्षांमध्ये हमखास यश मिळते, असे प्रतिपादन नांदुरा येथील नायब तहसीलदार आकाश किसवे यांनी येथे केले. ‘लोकमत’च्यावतीने बुधवारपासून स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाबाबत सुरू करण्यात आलेल्या ‘स्पर्धेच्या जगात’चे प्रकाशन नांदुरा येथील कृउबासच्या स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्रात करण्यात आले. यावेळी ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निळकंठ भगत होते. यावेळी उपसभापती साहेबराव फासे, पोलिस निरिक्षक उल्हास पाटील, कृउबास संचालक राजेश गावंडे, सचिव भोंगे, रामकृष्ण पाटील, लोकमत प्रतिनिधी संदीप गावंडे, स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी प्रतिनिधी अमोल अवचार, हेंमत पाटील, पूजा नारे यांची उपस्थिती होती. संचलन अनिल गवई यांनी केले. आभार रणजीत देशमुख यांनी मानले.
‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक!लोकमतच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या संस्कार मोती स्पर्धेसोबतच आता स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी लोकमतने सुरू केलेल्या स्पर्धेच्या जगातचे कौतुक यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.