शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्रासंदर्भातील निर्णय काँग्रेसचाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:50 IST

खामगाव : रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीच्या जात प्रमाणपत्राच्या  आधारे कुटुंबातील अन्य व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याचा  निर्णय काँग्रेस शासनाचा असून, राजपूत समाजाला न्याय  देण्यासाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काय केले, असा  प्रश्न माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थित केला.

ठळक मुद्देमाजी आमदार दिलीपकुमार सानंदांचे प्रतिपादनराजपूत समाजाला न्याय देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी काय केले?

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तीच्या जात प्रमाणपत्राच्या  आधारे कुटुंबातील अन्य व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याचा  निर्णय काँग्रेस शासनाचा असून, राजपूत समाजाला न्याय  देण्यासाठी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काय केले, असा  प्रश्न माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी उपस्थित केला. तालुक्यातील वर्णा येथे आयोजित राजपूत समाजाच्या मेळाव्यात  ते बोलत होते. यावेळी दिलीपकुमार सानंदा म्हणाले की,   सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय  क्र. २00७/प्र.क्र.७४/मावक-५ नुसार  २२ ऑगस्ट २00७  रोजी काँग्रेस शासनाच्या कार्यकाळात झाला. राजपूत समाज  बांधवांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न ना. फुंडकर यांनी  केवळ १0 दिवसात कसा मार्गी लावला, याबाबत आश्‍चर्य  व्यक्त करीत, फुंडकरांनी या प्रश्नी आजवर कुठलाही पाठपुरावा  न करता राजपूत समाजाचा प्रलंबित प्रश्न स्वत: मार्गी लावल्याचे  भासवून स्वत:ची प्रसिद्धी करून घेण्याचा हास्यास्पद प्रकार  आहे. त्यामुळे  ना. फुंडकरांनी राजपूत समाजाच्या जात प्रमाण पत्रासाठी नेमके नवीन काय केले, याचा खुलासा करावा, असे  आवाहनही  माजी आमदार  दिलीपकुमार सानंदा यांनी केले.  यावेळी     सानंदा म्हणाले की, राजपूत समाजाच्या वैधता प्रमाण पत्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सन २0१५ च्या हिवाळी  अधिवेशनात झालेल्या बैठकीत रोहयो व पर्यटन मंत्री नामदार  जयकुमार रावल यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.  मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाअधिवक्ता यांचा अभिप्राय मागवून  त्यानंतर निर्णय घेण्याचे आश्‍वासन रावल यांना दिले होते; परंतु  ३ ऑक्टोबर २0१७ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठक क्र. १४८  मध्ये सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत काँग्रेसच्या  कार्यकाळात सन २00७ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाप्रमाणेच  निर्णय घेऊन फक्त डिजिटल लॉकर सुविधेकरिता ३0 कोटी रु पयांची तरतूद करण्यात येणार आहे. राजपूत समाजातील सर्व पोटजातींचा विमुक्त जाती व भटक्या  जमातीमध्ये (व्हीजेएनटी) मध्ये समावेश करुन फुंडकर यांनी  विशेष शासन निर्णय काढून दाखवावा. जर ना. फुंडकर यांनी  असा शासन निर्णय काढला तर महाराष्ट्रातील राजपूत समाज  बांधवांच्यावतीने त्यांचा जाहीर जंगी सत्कार करण्यात येईल,  असेही  सानंदा म्हणाले. यावेळी प्रा. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. संचालन माजी जि. प.  सदस्य सुरेशसिंह तोमर यांनी केले.  प्रास्ताविक  विश्‍वपालसिंह  जाधव यांनी केले. या मेळाव्याला खामगाव, जलंब, खोलखेड,  वरणा, जयपूर लांडे, हिंगणा कारेगाव, निपाणा, बोरजवळा,  काळेगाव, पोरज, तांदुळवाडी, निमकव्हळा, नांद्री, संभापूर,  भंडारी व खामगाव मतदार संघातील राजपूत समाज बांधव उ पस्थित होते.    -