शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कृउबास संचालकपदी नियुक्तीचा न.प.चा ठराव बेकायदेशीर

By admin | Updated: May 30, 2017 00:52 IST

नियुक्तीच्या ठरावास आव्हान: जिल्हाधिकारी यांचा ‘जैसे थे’ चा आदेश

चिखली : नगर परिषदेने गत १६ मे रोजी झालेल्या विशेष सभेमध्ये घेतलेला ठराव क्रमांक २ नुसार चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालकपदी स्वप्नील अरूणकुमार गुप्ता यांची नियुक्ती केली होेती़ या ठरावास जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे प्रकरण दाखल करून आव्हान देण्यात आले होते. त्यानुसार प्रकरणाची सुनावणी घेऊन जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी सदरचा ठराव बेकायदेशीर ठरवून ‘जैसे थे’ परिस्थितीचा आदेश पारित केला आहे़. परिणामी, या ठरावावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांनी कोणतेही आदेश पारित केलेले नाहीत.कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालकपदी नियुक्ती करण्यासाठी चिखली नगर परिषदेने १६ मे २०१७ रोजी विशेष सभेत ठराव घेऊन स्वप्नील अरूणकुमार गुप्ता यांची संचालक म्हणून नियुक्ती केली होती; परंतु महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम १९६५ मधील कलम ३०८ अन्वये याप्रकरणी सभागृहातील विरोधी पक्षनेते अ.रफीक अ.कादर यांनी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे या नियुक्तीस आव्हान देणारे प्रकरण दाखल केले होते़ त्यावर २३ मे रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे समक्ष सुनावणी घेण्यात आली़ त्यावर जिल्हाधिकारी यांनी याप्रकरणी परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, असा आदेश पारित केला आहे़ या प्रकरणात अध्यक्ष नगर परिषद चिखली, मुख्याधिकारी नगर परिषद चिखली, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा, सचिव बाजार समिती चिखली यांना गैरअर्जदार करण्यात आले असून, कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली या संस्थेवर नियुक्ती देताना कायदेशीर ठराव घेऊन नगर परिषद सदस्यांनाच सदर संस्थेवर नियुक्ती देणे कायदेशीर आहे, असे नमूद केले आहे़ त्यामुळे स्वप्नील अरूणकुमार गुप्ता यांची बाजार समिती चिखली येथे झालेली नियुक्ती तूर्तास तरी ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बुलडाणा यांनी याप्रकरणी कोणताही आदेश पारित केलेला नाही़ अर्जदाराच्या बाजूने विधिज्ञ अ‍ॅड़ विलास नन्हई यांनी कामकाज पाहिले.