शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

चिंब पावसात बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 16, 2016 03:00 IST

गणरायाला निरोप देताना भाविकांचा उत्साह. खामगावात रात्री उशिरापर्यंंंत मिरवणूक सुरू होती.

बुलडाणा/खामगाव, दि. १५- गेल्या दहा दिवस भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेले पुढच्या वर्षी लवकर या, अशा गजरात विघ्नहर्ता गणरायाला १५ सप्टेंबर रोजी उत्साहात निरोप देण्यात आला. बुलडाणा तालुक्यात सायंकाळी जोरदार तर खामगाव तालुक्यात रिमझिम पडलेल्या पावसात गणरायाला निरोप देताना भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. खामगावसह काही शहरांमध्ये रात्री उशिरापर्यंंंत मिरवणूक सुरू होती. बुलडाणा शहरात सार्वजनिक गणेश मंडळांची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली. सर्व प्रथम संगम चौकातून गणेश विसर्जनासाठी मिरवणुकीने प्रारंभ झाला. सर्वात जुन्या सुवर्ण गणेश मंडळाला मानाचा गणपती म्हणून स्थान देण्यात आले. यावेळी हतेडी येथील महिला भजनी मंडळाने सहभाग घेतला. त्यानंतर रूद्र गणेश मंडळाची मिरवणूक ढोल, ताशाच्या निनादात काढण्यात आली, तर दुपारी सरकारी बगीच्या तलाव परिसरात विसर्जनासाठी एकच गर्दी उसळली होती. यावेळी बुलडाणा नगरपालिका व सामाजिक वनीकरण विभागाने निर्माल्य संकलन केंद्र उभारले होते. यावेळी पालिका व वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांंंनी निर्माल्य गोळा करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी अनेक भाविक भक्तांनी आपल्या सोबत आणलेले निर्माल्य संकलन केंद्राजवळ असलेल्या कार्यकर्त्यांंंकडे जमा करीत होते, तर अनेकांनी परिसरातील विहिरीवर गणपती विसर्जन केले होते. त्यामुळे सर्वत्र गणेश भक्तांची गर्दी दिसून येत होती, तसेच खामगाव शहरात मुख्य मिरवणुकीत २६ गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. कडक पोलिसांच्या बंदोबस्तात मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. मलकापूर, नांदुरा येथेही शांततेत मिरवणूक पार पडली.