शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

खादी व ग्रामोद्योगच्या सभासदांना कर्जमाफी

By admin | Updated: September 2, 2014 23:22 IST

अमरावती विभागातील खादी व ग्रामोद्योगच्या १0 हजार सभासदांना १२ कोटी ५९ लाख रुपयांची कर्जमाफी.

बुलडाणा : शासनाने खादी व ग्रामोद्योग मंडळांतर्गत कारागिरांना रोजगार हमी योजनेतून दिलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील बलुतेदार व ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या राज्यभरातील सभासदांना सुमारे ७९ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. त्यापैकी अमरावती विभागातील १0 हजार ४७८ सभासदांना १२ कोटी ५९ लाख १७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे.राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत राज्यातील बलुतेदार, ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या सभासदांना विविध ग्रामोद्योगांसाठी कारागीर योजना हमी योजनेंतर्गत वितरित केलेले कर्ज दीर्घ काळापासून थकीत आहे. त्यांना कर्जमाफी देण्यासाठी तालुकास्तरावरील एकूण ३११ बलुतेदार सहकारी संस्थांच्या सभासदांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वाटप केलेल्या कर्जाची थकबाकी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने घेतला असून, यासंदर्भात १ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरांवरील खादी ग्रामोद्योग कार्यालयांना आदेशही जारी करण्यात आले. त्यानुसार कर्जदारांच्या खात्यातून कर्ज माफीची रक्कम वजा करणे सुरू झाले आहे. माफ केलेली थकीत रक्कम शासनाकडून जिल्हा सहकारी बँकांना उपलब्ध करून देण्यात येईल. सर्व बँकांनी बलुतेदार, ग्रामोद्योग सहकारी संस्थांच्या सभासदांच्या नावे असलेली थकीत रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्याबाबत कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून दिल्या जाणार आहेत. जिल्हा          सभासद             कर्जमाफीची रक्कमअमरावती     २६३१                      २,२१,८७,२३५अकोला         ६९२                       १,१0,८२,१८१वाशिम          ५९२                       १,२३,८२,९८३यवतमाळ      ४३५८                     ५,२८,४२,00६बुलडाणा        २२0५                     २,७४,२२,६४0