शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

मृग नक्षत्र कोरडे गेल्याने पेरण्या खोळंबल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 00:07 IST

शेतकरी चिंतातुर; वरुणराजाचा रुसवा कायम.

मोताळा (जि. बुलडाणा): मृग नक्षत्रात हमखास पडणार्‍या पावसाने यावर्षीही पाठ फिरविल्याने तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. नक्षत्र कोरडे गेल्याने २२ जूनपासून सुरू होणार्‍या आद्र्रातही दमदार आणि पेरणीलायक पाऊस येतो की नाही, याची चिंता आता शेतकर्‍यांना सतावत आहे. तालुक्यात एकूण ५७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ घातली असून, बहुतांश शेती निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहे. रोहिणी नक्षत्रानंतर मृगाचा प्रारंभी एखादा दमदार पाऊस झाला की शेतकरी तिफणीवर मूठ धरतात आणि मृगाच्या दुसर्‍या चरणात जवळपास सर्व पेरण्या आटोपलेल्या असतात; मात्र यंदाही पावसाने वेळवर दगा दिला. मागील दोन वर्षांपासूनच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीत हतबल न होता शेतकरी वर्गाने नियोजन करून आपली फरपट थांबवण्याचा प्रयत्न केला. पावसाच्या भरवशावर हंगामी व पूर्व हंगामाची सोय असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी कपाशी, तूर, सोयाबीन, मका पिकाची लागवड केलेली आहे; मात्र आणखी काही दिवस पावसाने ताण दिल्यास अशा शेतकर्‍यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते. शेतकरी वर्ग शेती मशागतीची कामे आटोपून पेरणीसाठी सज्ज आहे. बी-बियाणे, खते घेऊन ठेवले आहेत. कधी एकदाचा वरुणराजा बरसतो, याची आस लागून आहे. कधी काळी धूळ पेरणीला मोताळा तालुका अग्रेसर असायचा; मात्र मागील पावसाचा लहरीपणा पाहता धूळ पेरणीस यावर्षीही शेतकरी धजावला नाही. सिंचनाची सोय असलेल्या अनेक शेतकर्‍यांनी मृगाच्या भरवशावर कपशीची लागवड करून ठेवली आहे; मात्र मृग कोरडा गेल्याने या शेतकर्‍यांचीही चिंता वाढली आहे. परिणामी पावसाअभावी पेरण्या लटकल्या असून, मूग, उडीद, तूर, तीळ, मिरची, मका, सोयाबीन आदी नगदी पिकांची बियाणे घरातच पडून आहेत. जुलै महिन्यापासून नगदी पिकांची तोडणी सुरू होते. त्यासाठी ७ ते १0 जूनपर्यंत या पिकांची पेरणी झाली पाहिजे; मात्र पावसाअभावी नगदी व ठोक पिकांची बियाणे घरातच पडून असल्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.