बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, माेताळा तालुक्यातील तळणी येथील ९०वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला असून, ३७९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ७१ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ४२३ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३७९ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ४४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०, बुलडाणा तालुका शिरपूर १, सिंदखेड १, संग्रामपूर तालुका उकळी १, सिं. राजा तालुका साखरखेर्डा १, चिखली शहरातील चार, चिखली तालुका केळवद ५, मालगणी १, अंचरवाडी १, अंत्री खेडेकर १, रानअंत्री १, दे. राजा शहरातील ८, लोणार शहरातील २, जळगाव जामोद शहरातील १, नांदुरा तालुका खुमगाव १, मलकापूर तालुका दुधलगाव १, मोताळा तालुका पिंप्री गवळी १, शेलगाव बाजार १, मूळ पत्ता कोनड, जि. जालना १, भुसावळ, जि. जळगाव येथील १ संशयित व्यक्तीचा समावेश आहे. काेरोनावर मात केल्याने दे. राजा येथून १६, लोणार २, बुलडाणा अपंग विद्यालय १६, स्री रुग्णालय २, खामगाव १, शेगाव- ८, चिखली ८, सिं. राजा ३, मेहकर ११, संग्रामपूर १, नांदुरा २, जळगाव जामोद येथील एकास रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात १७० जणांचा मृत्यू
तसेच आजपर्यंत एक लाख दहा हजार २०४ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच ९२९ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण १४ हजार ५६ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १३ हजार ३५४ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३३२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत १७० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.