मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील धामणगाव बढेपासून चार कि.मी. अंतरावरील किन्होळा-लालमाती मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २३ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. धामणगाव बढे परिसरातील किन्होळा येथील पुंडलिक गजमल वैराळकर यांचे गट नं. ६७ मध्ये शेत आहे. बुधवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जंगलातून अन्नपाण्यासाठी भटकत आलेल्या चार-पाच वर्षाच्या तडसाला अज्ञात वाहनाची धडक बसली. या दुर्घटनेत तडसाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती किन्होळा ग्रामस्थांनी तात्काळ मोताळा वनविभागाला दिली. दरम्यान वनरक्षक टवलारकर, वन शिपाई सुरुशे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृत तडसाला मोताळा येथे शवविच्छेदनास नेले
अज्ञात वाहनाच्या धडकेत तडसाचा मृत्यू
By admin | Updated: December 24, 2015 02:39 IST