बुलडाणा : मोताळा तालुक्यातील खडकी येथील तलावात एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. शे. अरशद शे. शकील असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो जुना गाव येथील रहिवासी आहे. जुना गाव येथील चार विद्यार्थी खडकी येथील तलावावर फिरण्यासाठी गेले होते. यातील शे. अरशद शे. शकील या विद्यार्थ्याने पोहण्यासाठी तलावात उडी घेतली; मात्र बराच वेळ होऊनही अरशद बाहेर आला नाही म्हणून त्याच्या मित्रांना चिंता वाटू लागली. त्यांनी थेट बुलडाणा गाठले व झालेला प्रकार घरी सांगितला. त्याच्या नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र अंधार पडल्यामुळे अरशदचे प्रेत बाहेर निघू शकले नाही. या संदर्भात बोराखेडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By admin | Updated: November 29, 2014 22:50 IST