जवळा बु. (बुलडाणा) : वडीलांकडे असलेल्या कर्जामुळे मुलाने वीष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २ डिसेंबर रोजी शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथे घडली. शेतकरी मुरलीधर नामदेव कान्हेरकर यांच्याकडे ६ एकर १७ गुंठे शेती असून, त्यांच्यावर जिल्हा बँकेचे ६0 हजाराचे कर्ज आहे. सततच्या नापिकीमुळे गत तीन वर्षापासून ते कर्जाची फेड करू शकत नव्हते. त्यामुळे ते चिंतातूर होते. या कौटुंबिक ताणतणावातून त्यांचा मुलगा गणेश (३२) याने १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान गुरांच्या गोठय़ात वीष प्राशन केले. त्याला तातडीने अकोला येथे उपचारासाठी भरती करण्यात आले. खासगी हॉस्पीटलचा खर्च झेपत नसल्यामुळे त्याला १ डिसेंबर रोजी शासकीय रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
विषप्राशन केलेल्या शेतकरीपुत्राचा मृत्यू
By admin | Updated: December 3, 2014 00:30 IST