शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

मलकापूर येथील एकाचा मृत्यू; ४४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:34 IST

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच ...

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी वृंदावन नगर, मलकापूर येथील ७५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच ४४ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २६२ अहवाल निगेटिव्ह असून, ३८ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड ॲन्टिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी मंगळवारी एकूण ३०६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २६२ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ४४ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ३८ व रॅपिड ॲन्टिजन टेस्टमधील ६ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ११४ तर रॅपिड टेस्टमधील १४८ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २६२ अहवाल निगेटिव्ह आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये खामगाव शहरातील पाच, खामगाव तालुका पळशी २, सुटाळा २, बुलडाणा शहरातील १७ , बुलडाणा तालुका पाडळी १, शेगाव शहर १, दे. राजा तालुका सिनगाव जहागीर १, वाकड १, चिखली तालुका सावरखेड १, भेराड १, चिखली शहरातील दाेन, नांदुरा तालुका धाडी ४, मेहकर शहर २, मोताळा शहरातील २, मोताळा तालुका वडगाव १, मलकापूर शहरातील १ येथील संशयीत व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. काेराेनावर मात केल्याने चिखली येथील आठ, शेगाव ९, मलकापूर येथील ३, बुलडाणा अपंग विद्यालय १३, स्त्री रुग्णालय १, दे. राजा १, मोताळा ३ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे, तसेच आजपर्यंत ९७ हजार ५७० अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १२ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या १२ हजार ८९५ आहे.

तसेच ८१८ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ९७ हजार ५७० आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण १३ हजार ४२५ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी १२ हजार ८९५ कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ३७० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत १६० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.