शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

माय-लेकाचा अपघातात मृत्यू

By admin | Updated: February 10, 2016 02:09 IST

मृत देवधाबा येथील; रावेर मार्गावरील घटना.

देवधाबा (जि. बुलडाणा): येथील ज्योती पुरुषोत्तम सपकाळ (२६ ) व यश पुरुषोत्तम सपकाळ (८) या मायलेकांचा मोटारसायकल व ट्रक अपघातात मृत्यू झाल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास गावाजवळ घडली. देवधाबा, ता. मलकापूर येथील पुरुषोत्तम सीताराम सपकाळ हे पत्नी ज्योती, मुलगा यश व मुलगी संध्या असे चार जण ज्योती सपकाळ यांच्या आतेबहिणीच्या येथे वास्तुशांती कार्यक्रमासाठी दाबिया (मध्यप्रदेश) येथे ९ फेब्रुवारी रोजी सकाळी मोटारसायकल क्रमांक एम.एच.१९ एएच ५४३ ने देवधाबा येथून जात होते. दरम्यान, त्यांच्या मोटारसायकलला मुक्ताईनगर ते रावेरदरम्यानच्या बोरर्डी गावाजवळ समोरून येणार्‍या ट्रक क्रमांक डब्ल्यूबीसी ५७७५ च्या चालकाने धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील ज्योती सपकाळ व मुलगा यश हे ट्रकच्या मागील चाकाखाली चेंगरल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पुरुषोत्तम सपकाळ व मुलगी संध्या हे विरुद्ध बाजूने फेकले गेल्याने जखमी झाले. याप्रकरणी रावेर पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, ट्रक जप्त केला आहे. एकाच अपघातात माय-लेकांचा मृत्यू झाल्याचे देवधाबा येथे शोकाकुल वातावरण होते. दु:खद वातावरणात या मायलेकांना चिताग्नी देण्यात आली. यश हा मलकापूर येथील स्कूल ऑफ स्कॉलरचा हुशार विद्यार्थी होता. त्याचे शाळेमधील शिक्षक, मुख्याध्यापिका व कर्मचार्‍यांनी अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहून श्रद्धांजली व्यक्त केली.