शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 11:27 IST

Death of a Gram Panchayat employee  वीज खांबावर चढताच विश्वंभर मांजरे यांना विजेचा शॉक लागला आणि ते वीज खांबावरच गतप्राण झाले

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा:  येथील पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या मलकापूर पांग्रा येथील एका ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा वीज खांबावर काम करीत असताना मृत्यू झाल्याची घटना १६ मार्च रोजी दुपारी घडली. प्रकरणी कर्मचाऱ्याच्या  मृत्यूस जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. यातील एकास साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली आहे.मलकापूर पांग्रा येथे महावितरणे ३३ केव्हीचे एक उपकेंद्र आहे. येथून गावात व  कृषी पंपासाठी वीज पुरवठा केला जातो. ३३  केव्ही लाईनवरील एका पोलवर ‘जंपर’ तुटल्याने गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानुषंगाने सकाळी १० वाजता लाईनमन प्रशांत देशमुख आणि सहाय्यक सोनपसारे हे तेथे गेले . स्वतः प्रशांत देशमुख आणि सोनपसारे यांनी परवानगी घेऊन वीज खांबावर चढून तेथे झालेला बिघाड काढण्याऐवजी ग्रामपंचायत कर्मचारी विश्वंभर श्रावण मांजरे यांना बोलावून मुख्य वाहिनीवरील दोष दुर करण्यासाठी खांबावर चढविले.  मात्र त्या अगोदर ३३ केव्ही वीज उपकेद्रातून तशी रितसर परवानगी घ्यावयास हवी होती.  परंतू परमीट घेतले असल्याचे सांगून त्यांनी विश्वंभर मांजरे यांना खांबावर चढविले.  वीज खांबावर चढताच विश्वंभर मांजरे यांना विजेचा शॉक लागला आणि ते वीज खांबावरच गतप्राण झाले. हा घटनाक्रम निदर्शनास येताच प्रशांत देशमुख व सहाय्यक सोनपसारे यांनी घटनास्थळावरून पलायन केले.  ही घटना गावा जवळच घल्याने नागरिकांचीही तेथे मोठी गर्दी जमली होती.

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा या प्रकरणी नंदू श्रावण मांजरे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी लाईनमन प्रशांत देशमुख आणि सहाय्यक सोनपसारे यांच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असून लाईनमन प्रशांत देशमुख यास अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास ठाणेदार जितेंद्र आडोळे हे करीत आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा