शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:21 IST

शेगाव : श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमाव्दारे पार पडला. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास मंगळवारी प्रारंभ झाला. 

ठळक मुद्देश्रींच्या यात्रा उत्सवात ३७ बसेसची अतिरिक्त व्यवस्थाउत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास मंगळवारी झाला प्रारंभ  

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव विविध कार्यक्रमाव्दारे पार पडला. या उत्सवात श्री गणेश यागास व वरूण यागास मंगळवारी प्रारंभ झाला. २६ ऑगस्टला १0 वा. यागाची पूर्णाहूती व अवभृतस्नान होईल व दुपारी २ वा. श्रींच्या पालखीची रथ मेणा इत्यादीकांतून गज, अश्‍वासह नगर परिक्रमा होईल. २२ रोजी विश्‍वस्त विश्‍वेश्‍वर त्रिकाळ यांच्या हस्ते ब्रम्हवृंदांच्या उपस्थितीत यागास   प्रारंभ करण्यात आले. २६ रोजी मिनी भाद्रपद शु.५ ला श्रीरामबुवा ठाकूर परभणी यांचे सकाळी ७ ते ९ श्रींचे समाधी सोहळ्यानिमित्त कीर्तन    होणार आहे. २७ रोजी श्रीधरबुवा आवारे मु.खापरवाडी यांचे सकाळी    ६ ते ७ काल्याचे कीर्तन होणार     आहे. व नंतर दहीहंडी, गोपाळकाला होईल.श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींच्या मंदिरात सकाळी ५ ते ६ काकडा, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, रात्री ८ ते १0 कीर्तन, सायंकाळी ५.३0 ते ६ हरिपाठ होत आहे. यात २२ रोजी मदनबुवा बिल्लारी रा. हराळ, २९  रोजी  अंबादासबुवा चौधरी    अमळनेर, २४ ला  प्रकाशबुवा शास्त्री धुळे, २५ ला  मच्छिंद्रबुवा अहिरे वाडी भोकर, २६ ला श्रीरामबुवा ठाकूर परभणी यांचे नित्यनेमाने कीर्तन होत आहे. श्रींचा १0७ वा पुण्यतिथी उत्सव निमित्त सर्व भक्तांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात गर्दी लक्षात घेता भक्तांच्या सोयीसाठी एकेरी मार्ग करण्यात आला आहे. 

श्रींच्या यात्रा उत्सवात ३७ बसेसची अतिरिक्त व्यवस्थाश्रींच्या यात्रा उत्सवादरम्यान २५ ते २७ पर्यंत खामगाव आगार ५ गाड्या, शेगाव आगार ८ गाड्या, चिखली आगार ५ गाड्या, मेहकर आगार ९ गाड्या, जळगाव आगार ५ गाड्या, मलकापूर आगार ५ गाड्या अशा ३७ गाड्या जास्तीच्या राहणार आहेत. यास्तव सावळे शाखा व्यवस्थापक व प्रशिक्षणार्थी १५ वाहक हे २५ ते २७ च्या दरम्यान होत असलेली गर्दी लक्षात घेता प्रवाशांना सोयीसाठी कार्यरत राहणार आहे. यासोबत तेल्हारा व अकोट आगाराच्या अतिरिक्त वाहतुकीच्या गाड्यांची व्यवस्था केल्या जाणार असल्याचे शेगाव आगाराच्यावतीने ए.जी. मुसळे यांनी सांगितले आहे. तसेच शेगाव पोलीस स्टेशनच्यावतीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे.