शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजे लखुजीराव जाधव यांची पुण्यतिथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्राची अस्मिता राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची ३८८ वी पुण्यतिथी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी त्यांना मानवंदना देऊन २५ जुलै रोजी साजरी करण्यात आली.यावेळी राजे लखुजीराव जाधव घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी राजे जाधव म्हणाले की, राजे लखुजीराव ...

ठळक मुद्देमातृतीर्थ नगरीत विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : महाराष्ट्राची अस्मिता राजमाता जिजाऊ यांचे वडील राजे लखुजीराव जाधव यांची ३८८ वी पुण्यतिथी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीस्थळी त्यांना मानवंदना देऊन २५ जुलै रोजी साजरी करण्यात आली.यावेळी राजे लखुजीराव जाधव घराण्याचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. शिवाजी राजे जाधव म्हणाले की, राजे लखुजीराव जाधव यांनी त्या काळातील महाराष्ट्रातील मराठा सरदार यांना मतभेद विसरून एकत्र आणले व मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीला राज्यात उपराजधानीचा दर्जा प्राप्त करून दिला. त्यांनी त्या काळी विकासाची अनेक कामे केली. शेतीसाठी, पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ठिकठिकाणी तलाव, धरण बांधले. या परिसराला त्यांनी समृद्ध बनविले. त्यामुळेच राजे लखुजीराव जाधव यांची जगातील सर्वात मोठी समाधी बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष देवीदास ठाकरे, सीताराम चौधरी, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब बुरकूल, महेश पवार, संजय मेहेत्रे, मोहनसिंग संभाजीराव राजे जाधव, मधुकर जाधव, बाळासाहेब राजे जाधव, डॉ.दत्तात्रय राजे जाधव, डॉ. श्रीकांत राजे जाधव, सतीश राजे जाधव, उमेश इंगळे, जी.डी. देशमुख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.नगर परिषदेमध्ये अभिवादनसिंदखेडराजा न.प.च्यावतीनेसुद्धा न.प. कार्यालयामध्ये लखुजीराव जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व फुले वाहून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, देवीदास ठाकरे, शिवाजी राजे जाधव, सीताराम चौधरी सर्व नगरसेवक व न.प. कर्मचारी उपस्थित होते.